मुंबई : गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर या काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर तातडीने रूग्णालयात दाखल करण्याच आलं होतं. मागील १६ दिवसांपासून त्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांनी ठोस अन्न खायला सुरूवात केल्याने त्यांच्या प्रकृतीत अधिक सुधारणा झाली आहे. त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी चाहत्यांनी प्रार्थना करावी असं डॉ. प्रतित समदानी यांनी आवाहन केलं आहे. मागच्या काही दिवसात सोशल मीडियावर अफवा पसरवली होती. ती खोटी असून लता मंगेशकर लवकर ब-या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा.
लता मंगेशकर यांच्या जवळच्या व्यक्ती अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी सांगितले की, त्यांच्या तब्येतील चांगली सुधारणा झाली असून काळजी करण्याचं काहीचं कारण नाही. तसेच त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्या लवकर ब-या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा.