आरोग्य

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण

नागपूर : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं समजतं.

डॉ. प्रकाश आमटे हे महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम पाहातात. गेल्या काही दिवसांपासून डॉ. प्रकाश आमटे यांना ताप होता. त्यांची RTPCR चाचणी निगेटीव्ह आली होती. पण तब्येतीत सुधारणा होत नसल्यानं त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यानुसार आमटे यांना नागपुरातील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आनंदवन, लोकबिरादारी प्रकल्प आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. प्रकाश आमटे हे भारत सरकारच्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचे मानकरी आहेत. याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगेसेसे, मदर तेरेसा पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे.

कोरोनामुळे जीवनशैलीत बदल करण्याची गरज
कोरोनानंतर शहारातील माणसांनी जीवनशैली बदलण्याची गरज असल्याचं मत डॉ. प्रकाश आमटे यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. “कोरोना कधी संपेल माहीत नाही. मास्क हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. सोशल डिस्टन्सिंंग हा शब्द चुकीचा आहे. आपण फिजिकल डिस्टन्सिंंग पाळले पाहिजे. दुर्दैवाने आपण ते अजिबात पाळत नाही”, अशी खंत देखील डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button