राजकारण

फडणवीसांनी दौऱ्यांसाठी ई-पास काढला आहे का? मुख्य सचिवांकडे विचारणा

अहमदनगर : राज्यात कोरोनाच्या बिकट परिस्थितीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते दौरे करत आहेत. पण, अहमदनगरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने यावर आक्षेप घेतला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे तक्रार केली आहे. तसंच, फडणवीस यांच्याकडे दौरे करण्याआधी परवानगी आहे का, अशी विचारणाही राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचा दौरा केला होता. अचानकपणे हा दौरा केल्यामुळे आरटीआ कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. कोरोनाच्या काळात फडणवीस यांच्याकडे जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमाप्रमाणे अर्ज केला आहे, अशी विचारणा माहितीच्या अधिकारातून मुख्य सचिवांकडे केली आहे. कोपरगावात भाजपच्या आमदाराने कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरला भेट देण्यासाठी फडणवीस कोपरगावात दाखल झाले होते. त्यामुळे संजय काळे यांनी याबद्दल शंका व्यक्त करत तक्रार दाखल केली आहे.

राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. तसंच जिल्हाबंदीचे आदेश सुद्धा दिले आहे. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी फडणवीस यांच्याकडे ई-पास होता का? १० पेक्षा जास्त लोकांची गर्दी करण्यास मनाई आहे, असं असताना फडणवीस यांच्या कार्यक्रमांना एवढी गर्दी कशी काय जमा होते? यावर प्रशासन, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने काही कारवाई केली का, अशीही विचारणा काळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button