राजकारण

पेगॅसस प्रकरणी ‘द हिंदू’चे एन. राम यांची सुप्रीम कोर्टात धाव

चेन्नई : ‘द हिंदू’ या वृत्तपत्र समुहाचे संचालक आणि माजी मुख्य संपादक एन. राम आणि एशियन कॉलेज ऑफ जर्नालिझमचे चेअरमन शशी कुमार यांनी पेगॅसस स्पायवेअर प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजी किंवा माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात यावी आणि या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी त्यांनी एका याचिकेच्या माध्यमातून केली आहे.

पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून सरकारवर देशातील ४० हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी सरकारची नेमकी भूमिका काय आहे, सरकारने या स्पायवेअरचा वापर कसा केला आहे याची सखोल चौकशी सुप्रीम कोर्टाने करावी अशी मागणी एन. राम आणि शशी कुमार यांनी केली आहे. पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील ज्या 40 लोकांवर पाळत ठेवण्यात आली आहे त्यामध्ये ‘द हिंदू’ चे माजी मुख्य संपादक आणि सध्याचे संचालक एन. राम यांचा समावेश असल्याचं फ्रान्सच्या मीडियाने स्पष्ट केलं आहे.

या स्पायवेअरचा वापर करण्याचा अधिकार कोणत्या सरकारी यंत्रणेला देण्यात आला होता आणि त्या माध्यमातून देशातील कोणत्या नागरिकांवर पाळत ठेवण्यात आली याचा तपास करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावा अशीही मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button