आरोग्य

राज्याला मोठा दिलासा; दिवसभरात ३७,३२६ कोरोना रुग्णांचे निदान

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झालेला मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. आज राज्यात ६१,६०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन ३७,३२६ रुग्णांचे निदान झाले आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा ४० हजारांच्या खाली आला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४४,५९,४२५ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्के झाले आहे. आज राज्यात ३७,३२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, तर आज ५४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.४९ टक्के एवढा आहे. मुंबईत दिवसभरात १,७९४ रुग्णांचे निदान झाले, तर पुण्यात ११६५ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button