राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ३ दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर
नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ३ दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. ते आज (11 जून) नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यास जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी त्यांचं स्वागत केलं. भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जून दरम्यान ३ दिवस नागपूरमध्ये असतील. या काळात ते अनेक भेटीगाठी करणार असून कार्यक्रमांनाही उपस्थित राहणार आहेत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी १४ जूनला पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या काळात ते विविध शिष्टमंडळाच्या भेटीगाठी घेणार आहेत. तसेच विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्याबाबत राज्यपाल कार्यालयानेही ट्विट करत माहिती दिली. यात म्हटलं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे तीन दिवसांच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे तीन दिवसांच्या भेटीसाठी नागपूर येथे आगमन झाले. विमानतळावर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार यांनी राज्यपालांचे स्वागत केले. pic.twitter.com/UCnwu5bQTt
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 11, 2021