रणजीत सिंह हत्या प्रकरणात राम रहीमसह पाचजण दोषी

नवी दिल्ली : हरियाणाच्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहीम यांना मोठा झटका देण्यात आला आहे. रणजीत सिंह हत्या प्रकरणात सीबीआय कोर्टात राम रहीमसह पाच आरोपांनी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांनी कोणत्या प्रकारची शिक्षा होणार याविषयी खुलासा करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआय स्पेशल कोर्ट १२ ऑक्टोबरला सर्व दोषी आरोपींना शिक्षा सुनावणार आहे. राम रहीम, कृष्ण लाल, सबगिल, अवतार आणि जसबीर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. यातील इंद्रसेन या एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
रणजीत सिंह हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी झाली. या सुनावणीला आरोपी गुरमीत राम रहीम आणि कृष्णा कुमार व्हिडिओ कॉन्सफर्न्सिंगद्वारे हजर राहिले होते तर आरोपी अवतार,जसवीर आणि सबदिल यांना प्रत्यक्ष कोर्टात हजर करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी सीबीआयला २६ ऑगस्ट रोजी करायची होती. हे प्रकरण १९ वर्ष जुने आहे. १२ ऑगस्टरोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी झाली होती. आज सीबीआयचे न्यायाधीश डॉ. सुशील कुमार गर्ग यांच्या कोर्टात जवळपास दीड तास सुनावणी केल्यानंतर आरोपींवर दोषी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आला. राम रहीमची केसची सुनावणी आधी सीबीआय न्यायधीश असलेले जगदीप सिंह यांनी केली होती मात्र त्यांच्या बदली नंतर ती केस न्यायाधीश गर्ग यांच्याकडे सोपवण्यात आली.
डेरा मॅनेजर रणजित सिंह यांची १० जुलै २००२ साली राम रहीम याने गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणी सीबीआय कोर्टाकडून राम रहीमला कलम ३०२ आणि १२० B अंतर्गत दोषी घोषित केले होते. त्यानंतर १२ जुलैला राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानुसार राम रहीम हरियाणाच्या रोहतक सुनरिया जेलमध्ये शिक्षा भोगत होता. रणजीत सिंह हा राम रहीमच्या डेऱ्याचा मॅनेजर तसेच त्याचा कट्टर भक्त होता. मात्र राम रहीमने रणजीत सिंहची गोळी घालून हत्या केली. तब्बल १९ वर्षांनी राम रहीमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे.




