
इंदूर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात हे सर्वसाधारण प्रकरण असल्याचं वाटत होतं. तेव्हा फर्स्ट इन्वेस्टिगेशन ऑफिसर असलेले मनोज रत्नाकर यांनी घरगुती विवादातून आत्महत्या केल्याचा अहवाल सादर केला होता. फाइल बंद करण्याची तयारीही सुरू झाली होती.
दोन महिन्यांनंतर महाराजांच्या जवळचे वकील निवेज बडजात्या यांना ५ कोटींच्या खंडणीचा कॉल आला. हा धमकीचा कॉल एकेकाळी महाराजांचा ड्रायव्हर असलेल्या कैलाश पाटील याने केला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्यावेळी महाराज यांची सेवा करणारा विनायक, शरद आणि शिष्या पलक यांच्यातील संबंधाचा खुलासा झाला. त्यानेहीदेखील हे मान्य केलं की, अनेकदा महाराज्यांच्या गाडीतून पलक हिला घरातून आश्रमात आणण्याचं काम केलं आहे.
गाडीमध्ये ती जे काही विनायक आणि शरदशी बोलत होती, ते त्याच्या लक्षात आहे. याच्या आधारावर पोलिसांनी तीन आरोपी शरद, विनायक आणि पलक यांचा जबाब नोंदवला. मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मिळून भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यासाठी जबरदस्ती करीत होते. पोलिसांच्या तपासात हे देखील समोर आलं की, महाराजांचे १२ तरुणींसोबत संबंध होते, यातील २ तर आयएएस आहेत. ‘दैनिक भास्कर’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली होती. या प्रकरणात दोन महिन्यांपर्यंत पोलिसांनी काहीच सुगावा लागत नव्हता. तत्कालीन अधिकारी हरिनारायण चारी मिश्र (आता इंदूरचे पोलीस आयुक्त) यांचे या प्रकरणात लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. महाराजांची फाइल बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसानेच महाराजांच्या सुसाइडच्या सहा महिन्यानंतर विनायक, पलक आणि शरद यांनी अटक केली.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला २० हून अधिक लोकांचा जबाब घेतला होता. कुटुंबातील काही सदस्यांनीही जबाब दिला. यादरम्यान भय्यू महाराज यांच्या जवळचे असलेले आणि गेल्या २२ वर्षांपासून त्यांच्यासोबत असलेले वकील निवेश बडजात्या यांना एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी ५ कोटींची मागणी केल्यानंतर तपासाला दिशा मिळाली.




