‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’ नवीन ‘युनो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’

मुंबई : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी ‘गोदरेज अॅण्ड बॉयस’च्या (जी अॅण्ड बी) ‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’ या व्यवसायातर्फे आज ‘उनो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट ट्रक’ बाजारात सादर करण्यात आला. या नव्या यंत्रामुळे ‘काउंटरबॅलन्स इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’च्या बाजारपेठेतील 30 टक्के हिस्सा आपल्याला 2024 या वर्षापर्यंत प्राप्त होईल, असा विश्वास या कंपनीने व्यक्त केला आहे. प्रगत स्वरुपाचे अर्गोनॉमिक्स, वर्धित सुरक्षा, सुधारीत दृश्यमानता आणि प्रत्येकवेळी चार्ज केल्यावर दीर्घकाळ चालण्याची क्षमता या वैशिष्ट्यांमुळे नवीन ‘उनो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’ हे 1.5 ते 3 टन फोर्कलिफ्ट श्रेणीतील अतिशय दणकट व उपयुक्त यंत्र ठरते. ‘उनो’च्या कार्यक्षमतेची तुलना याच टन क्षमतेच्या श्रेणीतील ‘डिझेल फोर्कलिफ्ट’च्या कार्यक्षमतेशी करता येईल. या व्यतिरिक्त, ‘उनो फोर्कलिफ्ट’ पर्यावरणाशी अनुकूल आहे व कामाच्या बाबतीत दणकट आहे.

भारतातील ‘फोर्कलिफ्ट’च्या बाजारपेठेत ‘गोदरेज मटेरिअल हॅंडलिंग’चे वर्चस्व आहे. गेली अनेक वर्षे ही कंपनी हरित तंत्रज्ञान व उत्पादने सादर करण्यामध्ये सतत नाविन्य आणत आहे. ‘ग्लोबल ईपी100’ उपक्रमाबाबत कटिबद्ध असलेल्या ‘गोदरेज अँड बॉयस’ने 2030 पर्यंत कार्बनची तीव्रता 30 टक्क्यांनी कमी करण्याचे आणि उर्जेची उत्पादकता दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे. या अनुषंगाने ही कंपनी बॅटरीवर चालणार्या उपकरणांसाठी ‘ली-आयन बॅटरी’वरही काम करत आहे. ‘ली-आयन बॅटरी’ कमी वेळात रिचार्ज होते आणि अधिक काळ चालते. याव्यतिरिक्त, पारंपारिक ‘लीड अॅसिड बॅटरी’पेक्षा, ‘ली-आयन बॅटरी’ अगदी छोट्या कालावधीत, (उदा. लंच ब्रेकसारख्या वेळेत) चार्ज केली जाऊ शकते आणि त्यामुळे तिच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत नाही. पुढील 5 वर्षांत ‘ली-आयन बॅटरी’ची मागणी लक्षणीय प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे, कारण वापरकर्त्यांना ‘फोर्कलिफ्ट’च्या ताफ्याची उत्पादकता वाढविण्याची गरज असणार आहे.
विशेष डिझाईन असलेल्या ‘युनो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’मुळे ‘इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’ श्रेणीमध्ये अनेक लाभ उपलब्ध झाले आहे :
– वेगवान प्रवास आणि उचलण्याच्या गतीसह तीस टक्के जास्त ‘थ्रूपूट’ (पॅलेट्स हलविण्याचे दर ताशी प्रमाण).
– ऑपरेटरच्या आरामदायी सोईनुसार डिझाइन केलेले, जास्त काम करावे लागण्याच्या स्थितीतही दीर्घ काळ सुलभतेने चालण्याची क्षमता.
– भारतीय परिस्थितीला अनुकूल अशा स्वदेशी डिझाइन केलेल्या ‘एसी मोटर’ तंत्रज्ञानासह उत्कृष्ट विश्वसनीयता. ‘फोर्कलिफ्ट’साठी स्वतःची ‘एसी इलेक्ट्रिक मोटर्स’ बनविणारी ‘जी अँड बी’ ही एकमेव भारतीय कंपनी.
– या ‘फोर्कलिफ्ट’च्या मजबूत बांधणीमुळे, कठोर परिस्थितीत काम करताना, संवेदनशील अशा अंतर्गत घटकांचे नुकसान होण्यापासून संरक्षण.
– उष्णकटिबंधीय हवामान परिस्थितीतही उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणालीद्वारे निरंतर काम.
या नव्या उत्पादनाच्या सादरीकरणाविषयी ‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझिनेस हेड अनिल लिंगायत म्हणाले, “गोदरेजमध्ये आम्ही तयार केलेली उत्पादने ही नेहमीच पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत असतात. पर्यावरण शाबूत राखण्याच्या आमच्या सततच्या प्रयत्नांमध्ये आम्ही ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी नवीन ‘युनो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट्स’ सादर करीत आहोत आणि आमच्या ‘ग्रीन फोर्कलिफ्ट’ची श्रेणी विस्तारीत करीत आहोत. ही फोर्कलिफ्ट्स ऑपरेटरना वापरण्यास अतिशय सुलभ आहेत आणि ग्राहकांना त्यांच्या कारखान्यांमध्ये व गोदामांमध्ये जास्तीत जास्त ‘थ्रूपूट’ देणारी आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हापासून ग्राहकांच्या खरेदीच्या मानसिकतेत लक्षणीय बदल झाला आहे. परिणामी उत्पादनांची खरेदी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात होत आहे. आधीपासूनच भरभराट होत असलेल्या ईकॉमर्स उद्योगाला, तसेच आवश्यक वस्तू पुरवणार्या उद्योगांना ही परिस्थिती पूरक आहे. कामगारांची कमतरता असल्याच्या काळात, उत्पादकांना आणि वितरकांना पुरवठा साखळी शाबूत ठेवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागत आहे. अशा स्थितीत, संघटित गोदामे आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांच्या वाढीस चालना मिळणार आहे. त्यातूनच विविध उद्योगांकडून ‘गोदरेज मटेरियल हँडलिंग’कडे ‘फोर्कलिफ्ट’साठी मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. नवीन यु’नो इलेक्ट्रिक फोर्कलिफ्ट’ ‘मटेरियल हँडलिंग ऑपरेशन्स’साठी बहुपयोगी आहेत. अन्न व पेय पदार्थ, फार्मास्युटिकल्स, रसायने, ऑटोमोटिव्ह, पेपर अँड पॅकेजिंग, 3पीएल, उपकरणे आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आदी क्षेत्रांमध्ये त्या उत्तम सेवा देतील.”




