‘आयकिया’च्या ‘बेटर लिव्हिंग चॅलेंज’चे दुसरे सत्र

मुंबई : जागतिक स्तरावरील आघाडीची बहुआयामी स्वीडिश गृह फर्निशिंग किरकोळ विक्रेता कंपनी ‘आयकिया’ने ‘आयकिया बेटर लिव्हिंग चॅलेंज २०२१’ दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. त्या माध्यमातून कंपनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करत तुमच्या घरात आणि अगदी जगामाध्येही फार मोठे बदल करता येतात ही बाब अधोरेखित करू इच्छिते.
कंपनीने ‘बेटर लिव्हिंग अॅप’ गतवर्षी दाखल केले होते आणि त्या माध्यमातून कित्येक भारतीयांना आपल्या घरी निरंतर (sustainable) आयुष्य जगणे सुकर करावे, ही योजना होती. अगदी सोप्या आणि दैनंदिन आयुष्यातील गोष्टींचा अवलंब करत मोठे बदल आयुष्यात घडवून आणता येतात, हे बिंबवणे ही त्यामागची संकल्पना होती. या अॅपमध्ये किती ऊर्जा, कार्बन आणि पाणी लोक खऱ्या अर्थाने वाचवू शकतात याचा हिशेब असतो. पर्यावरणस्नेही आरोग्याच्या दृष्टीने काय पावले उचलली जावू शकतात, याबाबतचा उहापोह्सुद्धा त्याद्वारे केला गेला आहे.
‘बेटर लिव्हिंग चॅलेंज’च्या ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या पहिल्या सत्रामध्ये हे अॅप विक्रमी अशा २७,४८५ जणांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. इंग्का ग्रुपच्या इतिहासात ‘आयकिया इंडिया’ने एखाद्या देशात समाज व पर्यावरणावरील सकारात्मक परिणामासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणवर अॅप डाऊनलोड केले जाण्याचा हा विक्रम नोंदविला गेला. गतवर्षी या चॅलेंजच्या माध्यमातून ३७.८ हजार किलो कार्बन फुटप्रिंट (कार्बन डायऑक्साईड) वाचविला गेला. हे प्रमाण ४४,००० लिटर डीझेल जाळण्याएवढे मोठे आहे. या अॅपच्या माध्यमातून १.४ दशलक्ष लिटर पाणी वाचविणे शक्य झाले. ही बचत १.८६ लाख लोकांना पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याएवधी होती.
यंदाच्या वर्षीच्या आव्हानामध्येसुद्धा १०० पेक्षा कॅशबॅक ऑफर बक्षीसरूपाने दिली जाणार आहे. अव्वल ५ विजेत्यांना प्रतिव्यक्ती तब्बल १०,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतात. ही ऑफर १००० ते १०,००० रुपयांदरम्यान आहे. “२०२० मधील ‘बेटर लिव्हिंग चॅलेंज’साठी आम्हाला आमच्या ग्राहकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. भारतात विक्रमी संख्येने डाऊनलोड केले गेले आणि आयकियाच्या जगभरातील संख्येचा विचार करता सर्वाधिक अशी ही संख्या होती. जागतिक स्तरावर विचार करता आयकिया कार्यरत असलेल्या इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातील ही संख्या सर्वाधिक होती. ‘आयकिया बेटर लिव्हिंग अॅप’च्या माध्यमातून लोकांनी आपले दैनंदिन आयुष्य अधिक वातावरण-स्नेही पध्दतीने जगावे असा आमचा मानस आहे. हे अॅप विनामूल्य असून लोकांना त्या माध्यमातून स्वतःचे फुटप्रिंट किती आहेत आणि त्यात कशी घट करावी याचे ज्ञान मिळते. जागतिक स्तरावर त्यात अधिक व्यापक गोष्टींचा सामावेश केला जातो. त्यात सोलर पॅनेल उभारणे तसेच तुमचा शॉवरचा वापर कमी करणे तसेच एक दिवस झाडासंबंधी गोष्टी आहारात घेणे आदी इतर छोटयामोठ्या गोष्टीचा समावेश होतो. या आव्हानामध्ये लोक त्यांच्या निरंतर गोष्टींचा समावेश करून पॉइंट मिवळू शकतात आणि बक्षिसे खिशात घालू शकतात. ९१,७५० पेक्षाही अधिक ग्राहकांनी २० देशांमध्ये हे अॅप डाऊनलोड केले आहे. त्यांनी ज्या क्रिया केल्या आहेत, त्यांचा विचार करता आमचा असा अंदाज आहे की, त्यांनी साधारण २२,००० टन कार्बन डायऑक्साईडची आणि १००० टन कचऱ्याची निर्मिती टाळली असावी. त्याशिवाय त्यांनी तब्बल १९९ दशलक्ष लिटर पाण्याची बचत केली असावी. ‘बेटर लिव्हिंग चॅलेंज २०२१’हा आमच्या वातावरण सकारात्मक होण्याच्या लक्ष्याच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्याद्वारे १ अब्ज लोक २०३०च्या शेवटपर्यंत अधिक निरंतरपणे राहू शकतात,” असे उद्गार ‘आयकिया इंडिया’चे मुख्य अर्थ अधिकारी आणि निरंतरता पुढाकार प्रमुख प्रीत धुपार यांनी काढले.
‘आयकिया बेटर लिव्हिंग अॅप’चा वापर अधिकाधिक लोकांना कमीतकमी कार्बन डायऑक्साईड असलेल्या समाजाचा भाग होण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने सामावून घेण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून केला जाणार आहे. त्याचा वापर निरंतरतासंबंधी ज्या टिप्स आहेत त्या कृतीत आणण्यासाठी होतो कारण या गोष्टी ग्राहक अॅपमध्ये लॉग इन करून स्वतः प्रत्यक्ष करतो. ‘आयकिया बेटर लिव्हिंग अॅप चॅलेंज २०२१’ची सुरुवात ११ मार्च २०२१ रोजी झाली आणि त्यात अॅपआधारित कृती कार्यक्रम आहे. त्यात कोणीही आणि प्रत्येकजण सहभागी होवू शकतो आणि त्यातून एक आनंदी घर आणि पृथ्वी निर्माण होवू शकते. हे चार आठवड्यांचे चॅलेंज असून ते १० एप्रिल २०२१ रोजी संपणार आहे. यातील विजेते आणि त्यांनी साधलेले परिणाम यांची घोषणा पृथ्वी दिनी म्हणजे २२ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
एकदा हे चॅलेंज संपले की लोक हे अॅप नियमितपणे वापरू शकतात आणि त्यांच्या निरंतरता कृती करू शकतात. निरंतरता आयुष्यप्रणाली साध्य करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करावे हे या चॅलेंजमागील उद्दिष्ट आहे. या कृतीमध्ये सामावल्यामुळे ग्राहकांना आरोग्यपूर्ण पृथ्वी बनविण्याप्रती त्यांचे योगदान काय, हे कळू शकेल. या चॅलेंजच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करणे आणि स्त्रोतांच्या वापरासाठी ज्ञान पसरविणे तसेच त्याद्वारे पर्यावरणसंबंधी फुटप्रिंट कमी करणे हा उद्देश आहे.