राजकारण

सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला जाहीर केलेला निधी त्वरीत द्या

संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

नवी मुंबई : मराठा समाजाकडून सरकारच्या मदतीसाठी दोन वरिष्ठ वकील दिले असल्याचे नवी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान राज्य सरकारने सारथी संस्था आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळासाठी जाहीर केलेला निधी त्वरीत द्यावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीत का केलं नाही?, असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे. वाशी येथे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजी राजे उपस्थित होते. राज्य सरकारकडून मागास आयोगाचा संपूर्ण अहवाल वरिष्ठ वकिलांना अभ्यासासाठी भाषांतरीत करून दिला नसल्याचा आरोप संभाजी राजे यांनी केला. मागासवर्गीय आयोग भाषांतरीत केला असता तर आभ्यास करणे सोपे गेले असते, असं ते म्हणाले. मागासवर्गीय अहवालाचे संपूर्ण भाषांतर सरकारने इंग्रजीत भाषांतर न करुन सरकारने त्यांचा हलगर्जीपणा दाखवला आहे, असं म्हणत जर सरकारने अहवालाचं इंग्रजी भाषांतर केलं असतं तर अभ्यास करणं सोपं गेलं असतं, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणावर कोर्टात सुनावणी, सरकारने एकदिलाने सामोरे जावे
मराठा आरक्षणावर येत्या 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी तरी सरकारने एकदिलाने सामोरे जावे, असे अवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button