चौकार षटकार
१) सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा – देवेंद्र फडणवीस
# सरकार बदलणं म्हणजे पलंगावरची चादर बदलणं वाटतंय की काय यांना ?
२) पूर्वीच्या लोकांपेक्षा आजची पिढी मला अधिक जबाबदार व सजग वाटते – नाना पाटेकर
# यातून तुमच्याबद्दल काय निष्कर्ष काढायचा नाना ? ही स्वतःबद्दलची कबुली समजायची का ?
३) संभाजी भिडेंवर चौकशी करून कारवाई करू – जयंत पाटील
# जे वक्तव्य त्यांनी जाहीरपणे केले आहे त्याची काय चौकशी करणार आहात ?
४) फडणवीस जे बोलले ते सर्वच बोलत असतात. त्याला काय महत्त्व द्यायचे – संजय राऊत
# हो ना, खरंच आहे. ज्या दिवशी शरद पवार बोलतील, त्या दिवशीच महत्त्व द्यायचे .
५) लष्कराच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन पुरवा – उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
# पंतप्रधान म्हणतील, ‘ अरे भाई, हवाई मार्ग से क्या मंगवा रहे हो , हवामें कितना सारा ओक्सिजन हैं , वो निकाल लो ना ! लगे तो हमारे गुजरात से थोड़ी हवा भिजवा देता हूं.’
६) अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका. स्पष्टता ठेवा. – मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधिकाऱ्यांना आवाहन
# हो ना, मुख्यमंत्र्यांच्या मनातही गोंधळ आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मनातही गोंधळ , असं कसं चालेल ?कुठेतरी स्पष्टता हवीच !
७) सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे – अजीत पवार
#अगदी बरोबर ! श्रीकृष्ण कधीच जन्माला आला आहे, हे कंसाला तरी कुठं माहीत होतं ?
८) अजित पवारांनी इतका अहंकार बाळगू नये – चंद्रकांत पाटील
# रिकामं भांडंच जास्त आवाज करतं , त्याला काय करणार ?
९) सरकारचे पॅकेज अपुरे – नाना पटोले
# तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात की विरोधी पक्षात ?
१०) पंतप्रधान फोन उचलत नाही – उध्दव ठाकरे
# फोन उचलून ओळख न दाखवण्यापेक्षा हे केव्हाही चांगलंच . नाही का ?
११) महाराष्ट्राला रेमडेसीविर पुरवाल तर परवाने रद्द करू असे केंद्राकडून धमकावले जात आहे – नबाब मलिक
# काका – पुतण्याने किती बालबुद्धीची माणसं जमा करून ठेवली आहेत !
१२) देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेतेपदाची पाच वर्षे पूर्ण करणार नाहीत – जयंत पाटील
# अरे व्वा ! ‘ अहमदाबाद डिल’ यांना माहीत आहे तर !
१३) माझा नाद करायचा नाही – अजितदादा पवार
# हे राजकारणातले ‘ दादा’ कमी आणि गल्लीतले ‘दादा’ जास्त वाटतात !
१४) आम्ही अजित पवारांना ‘xत्र्या’ म्हटलं तर चालेल का – निलेश राणे
# आजकालच्या राजकारणाची आणि राजकारण्यांची पातळी पाहता चालेल !
१५) महाराष्ट्राकडून भीक मागतो ऑक्सिजन पुरवा – जितेंद्र आव्हाडांची पंतप्रधानांना विनंती
# भीक मागणं, विनंती करणं तुम्हाला शोभत नाही आव्हाड, आणा की बंगल्यावर उचलून आणि दाखवा तुमची टगेगिरी.
१६) राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही धोका -मुख्यमंत्री
# ‘ दुसरी लाट तर परतवून लावूच, पण तिसरी येऊच देणार नाही.’ असं बोललात त्या दिवशी महाशिवरात्री होती का ?