शिक्षण

परदेशी शिक्षण मंच ‘लीप’ची १७ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

मुंबई : भारतातील आघाडीचा परदेशी शिक्षण मंच ‘लीप’ने इक्विटी फायनान्सच्या नव्या फेरीतील सीरीज बीमध्ये १७ दशलक्ष डॉलर्स (१२० कोटी रुपये) ची निधी उभारणी केली आहे. या फेरीचे नेतृत्व सिंगापूरमधील जंगल व्हेंचर्स, सिक्वोइया कॅपिटल इंडिया आणि जगातील सर्वात मोठा एडटेक केंद्रीत व्हीसी फंड आउल व्हेंचर्सने केले. सिक्वोइयाच्या नेतृत्वात लीपने ५.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला होता, त्यानंतर एका वर्षाच्या आतच ही फेरी झाली असून या स्टार्टअपने आतापर्यंत २२.५ दशलक्ष डॉलर्सचे भांडवल उभारले आहे. लीपद्वारे लीप फायनान्स आणि लीप स्कॉलरचे संचालन केले जाते.

परदेशात शिक्षणाची महत्त्वाकांक्षा असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी लीप वन-स्टॉप प्लॅटफॉर्म तयार करत आहे. कंपनी आपल्या उत्पादनांचा पोर्टफोलिओ विस्तारण्यासाठी नव्या भांडवलाचा वापर करणार आहे. तसेच तंत्रज्ञान व उद्योगातील कामकाज, भौगोलिक विस्तारासाठी तसेच विद्यार्थी समूहात अधिक प्रभावीपणे वृद्धीकरिता टीमला बळकट करण्याकरिता या निधीचा वापर केला जाईल.

लीपचे सहसंस्थापक अर्णव कुमार म्हणाले, “विदेशी शिक्षण घेण्यासाठी जे-जे हवे, त्या सगळ्यांसाठी आमच्याकडे वन-स्टॉप सोल्युशन आहे. भारतात स्टेम एज्युकेटेड इंग्लिश स्पीकिंग पदवीधरांचा सर्वात मोठा समूह आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील डिग्री घेऊन त्यात करिअर करायचे असते. हा मोठा निर्णय असून त्यासाठी अचूक माहिती व तज्ञांचे मार्गदर्शन हवे असते. आमच्या ऑनलाइन कम्युनिटीद्वारे विद्यार्थ्यांना करिअरच्या पर्यायांचे मूल्यांकन करणे, सिनिअर्सचे नेटवर्क उपलब्ध करणे तसेच उत्कृष्ट कोर्स शॉर्टलिस्ट करण्यासाठी मदत केली जाते. त्यानंतर हा डेटा पर्सनलाइज्ड टेस्ट प्रेप, प्रोफेशनल कौंसिलिंग सर्व्हिस, व्हिसा मार्गदर्शन आणि वित्तीय उत्पादनांकरिता वापरला जातो.”

लीपची २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय एज्युकेशन लोन उत्पादनांसह स्थापना झाली. या कर्जात शून्य कोलॅटरल, अभ्यासाचा पूर्ण खर्च, भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण घेण्याकरिता डॉलर्समध्ये लोन आदी सुविधांचा समावेश आहे. त्यानंतर लीपने कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातही उत्पादन समूहांचा विस्तार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button