अर्थ-उद्योग

पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी विमानसेवा; २० ऑगस्टपासून प्रारंभ

पुणे: पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी विमान सेवा सुरु होणार आहे. इंडिगो या विमान वाहतूक कंपनीकडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दर सोमवारी आणि शुक्रवारी पुण्याहून अमृतसरसाठी विमान सुटेल. अमृतसरसाठी २० ऑगस्टपासून तर रांची आणि तिरुअनंतपुरमसाठी २१ ऑगस्टपासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू होईल.

दुसरीकडे कोल्हापूर ते नागपूर या विमानसेवेचाही प्रारंभ होणार आहे. याशिवाय, कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरु होईल. आठवड्यातून तीनवेळा कोल्हापुरहून अहमदाबादसाठी विमान सुटेल. या विमानसेवांसाठीच्या ऑनलाईन बुकिंगलाही सुरुवात झाली आहे.

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नांदेडबरोबरच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

मुंबईतून १ वाजून २५ मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button