अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

टेक्‍नोकडून नवीन उत्‍पादनांच्‍या श्रेणीसह अ‍ॅक्‍सेसरीज पोर्टफोलिओमध्‍ये वाढ

नवी दिल्‍ली : टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांचा उत्‍पादन पोर्टफोलिओ वाढवण्‍याच्‍या, तसेच त्‍यांची कनेक्‍टेड डिवाईस इकोयंत्रणा दृढ करण्‍याच्‍या उद्देशाने स्‍मार्टफोन अ‍ॅक्‍सेसरीजची सिरीज सादर करण्‍याची घोषणा केली. ब्रॅण्‍ड नवीन टीडब्‍ल्‍यूएस बड्स १, हॉट बीट्स १२ व प्राइम पी१ इअरफोनसह फास्‍ट चार्जिंग मायक्रो यूएसबी केबल एम११ सादर करत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना निवडण्‍यासाठी उत्‍पादनांची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध होईल. नवीन उत्‍पादन ऑफरिंग्‍ज टेक्‍नोला किफायतशीर दरामध्‍ये मूल्‍य संवदेनशील अ‍ॅक्‍सेसरीज विभागातील स्‍थान अधिक दृढ करण्‍यामध्‍ये सक्षम करतील.

ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्‍हणाले, भारतातील स्‍मार्टफोन अॅक्‍सेसरीज बाजारपेठ सातत्‍याने विकसित होत आली आहे आणि २०२१ मध्‍ये अधिक झपाट्याने विकसित हेाण्‍याची अपेक्षा आहे. ग्राहकांचा ऑडिओ, पोर्टेबिलिटी व स्‍मार्ट असिस्‍ट्ससह फास्‍ट चार्ज क्षमतेवरील वाढत्‍या फोकसमुळे स्‍मार्टफोन निर्माण करणा-या कंपन्‍यांना किफायतशीर दरामध्‍ये एकूण युजर अनुभव वाढवणारी उच्‍च दर्जाची कनेक्‍टेड डिवाईस इकोप्रणाली देण्‍यासाठी त्‍यांच्‍या इन-हाऊस अ‍ॅक्‍सेसरीज पोर्टफोलिओमध्‍ये सुधारणा करण्‍यास भाग पाडले आहे. नवीन उत्‍पादनांसह टेक्‍नोचा पोर्टफोलिओ अधिक प्रबळ बनला आहे आणि टेक्‍नोच्‍या कनेक्‍टेड डिवाईस इकोप्रणालीमधील अधिक सुधारणा ग्राहक अनुभवामध्‍ये अधिक वाढ करतील. आम्‍ही गेल्‍या वर्षी हायपॉड्स एच२ व मिनीपॉड एम१ सादर केले आणि या २ उत्‍पादनांना मिळालेल्‍या प्रतिसादामुळे आम्‍हाला प्रबळ टेक्‍नो उत्‍पादन पोर्टफोलिओ निर्माण करण्‍यासाठी अधिक अ‍ॅक्‍सेसरीज सादर करण्‍यास प्रेरणा मिळाली.

टेक्‍नो इअरबड्स १ (टीडब्‍ल्‍यूएस): मनोरंजनासाठी उत्तम सुविधेचा विचार करता तेव्‍हा टेक्‍नो इअरबड्स १ त्‍याची पूर्तता करतात. या वायरलेस बड्स १ मध्‍ये ४० एमएएच* २ बॅटरी आहे, ज्‍यामधून एका चार्जमध्‍ये ४ तासांच्या म्‍युझिक प्‍लेबॅक टाइमची खात्री मिळते. तसेच ३०० एमएएच चार्जिंग केस १२ तासांहून अधिक वेळेपर्यंत विनाव्‍यत्‍यय संगीत ऐकण्‍याचा अनुभव देते. या इअरबड्समध्‍ये स्थिर कनेक्‍शन व सुलभ ऑडिओ ट्रान्‍समिशनसाठी आधुनिक ब्‍ल्‍यूटूथ ५.० आहे. तसेच यामध्‍ये पाणी व घामापासून संरक्षणासाठी आयपीएक्‍स४ संरक्षण आहे. ज्‍यामुळे तुम्‍ही जॉगिंग किंवा व्‍यायाम करताना संगीत ऐकण्‍याचा आनंद घेऊ शकता. कोमल सिलिकॉन इअर टिप्‍स व इअर हूक्‍स अधिक काळापर्यंत संगीत ऐकण्‍याचा आनंद घेताना सौम्‍य व उत्तम ग्रिपची खात्री देतात. या वायरलेस इअरबड्समध्‍ये सिंगल व डबल असे दोन मोड्स आहेत, ज्‍यामधून मुख्‍यत्‍वे ड्रायव्हिंगच्‍या वेळी बॅकग्राऊण्‍ड आवाज ऐकू येण्‍यासाठी जोडीमध्‍ये उत्तमप्रकारे बदल करण्‍याची खात्री मिळते. या वैशिष्‍ट्यासह व्‍यक्‍ती कोणतेतरी एक इअरबड्स बंद करून कॉल्‍स घेऊ शकते आणि बाहेरील वाहतूकीदरम्‍यान दुस-या कानाने दक्ष राहू शकते. टेक्‍नो इअरबड्स १ ची किंमत १,२९९ रूपये आहे.

वायर्ड इअरफोन्‍स – चालता-फिरता संगीत ऐकण्‍याचा आनंद घेण्‍यासाठी मजबूत, स्‍टायलिश व विश्‍वसनीय इअरफोन्‍सचा शोध घेत असाल तर टेक्‍नोचा हा इअरफोन्‍सचा नवीन सेट अगदी परिपूर्ण आहे.

हॉट बीट्स १२: हॉट बीट्स १२ इअरफोन्‍समध्‍ये सुस्‍पष्‍ट आवाजासाठी ड्युअल साऊंड ड्रायव्‍हर आहे. तसेच यामध्‍ये इन-लाइन कंट्रोल युनिटसह फंक्‍शन्‍स जसे प्‍ले, पॉज, व्‍हॉल्‍युम समायोजित करणे, कॉल्‍स स्‍वीकारणे किंवा नाकारणे आणि इन-बिल्‍ट मायक्रोफोन आहे. बास आवाज असलेले क्‍वॉड स्‍पीकर्स बाहेरील आवाज ऐकू न येण्‍याची खात्री देतात. हॉट बीट्स १२ इअरफोन्‍स टीपीई थ्रेड वायर १.२ एमसह सुरक्षित आहेत. हॉट बीट्स १२ ची किंमत ३४९ रूपये आहे.
प्राइम पी१: टेक्‍नो प्राइम पी१ मध्‍ये सडपातळ व आकर्षक मेटॅलिक डिझाइन व सुरक्षित टीपीई वायर आहे. तसेच यामध्‍ये हँड्स-फ्री कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि सुलभपणे प्‍ले, पॉज व व्‍हॉल्‍युम समायोजित करण्‍यासाठी मल्‍टी-फंक्‍शन बटन रिमोट आहे. प्राइम पी१ इअरफोन्‍समध्‍ये सुस्‍पष्‍ट ऑडिओ क्‍वॉलिटीसाठी विशाल मेगा बास आहे. वजनाने अत्‍यंत हलका व आरामदायी प्राइम पी१ ची किंमत २२५ रूपये आहे.

केबल एम११: अत्‍यंत लांब, २ अॅम्पियर फास्‍ट चार्जिंग, मायक्रो यूएसबी असलेली केबल एम११ ५.० व्‍हॉल्‍ट/२.१ अॅम्पियरच्‍या आऊटपुटसह हाय स्‍पीड डेटा ट्रान्‍सफर देते. १ मीटर लांब असलेली केबल नुकसान किंवा मोडतोडीपासून संरक्षणासाठी उच्‍च दर्जाच्‍या टिकाऊ पीव्‍हीसीसह डिझाइन करण्‍यात आली आहे. केबल एम११ ची किंमत १२५ रूपये आहे.

कंपनी वायर्ड इअरफोन्‍स व डेटा केबलवर तीन महिन्‍यांची रिप्‍लेसमेंट वॉरण्‍टी आणि बड्स १ वर सहा महिन्‍यांची वॉरण्‍टी देखील देते. टेक्‍नोच्‍या ऑफलाइन रिटेल आऊटलेट्समध्‍ये अ‍ॅक्‍सेसरीज खरेदी करता येऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button