‘व्होल्टास’ची ‘महा-अॅडजेटेबल इन्व्हर्टर एसी’ची श्रेणी

मुंबई : शीतकरण उत्पादनांमध्ये भारतात निर्विवादपणे अग्रगण्य असलेल्या व एसी ब्रॅंडमध्ये पहिले स्थान असलेल्या टाटा उद्योगसमुहातील ‘व्होल्टास’ या कंपनीने, ‘व्होल्टास महा-अॅडजेटेबल इन्व्हर्टर एसी’ची नवीन सुधारीत आवृत्ती सादर करून शीतकरणातील उत्पादनांमध्ये आपले नेतृत्त्व अधिक बळकट केले आहे. गेल्या वर्षी कोरोना साथीच्या काळात, ‘व्होल्टास’ने केलेल्या ‘इंडियाज कूलिंग हॅबिट्स’ या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर हे उत्पादन सादर करण्यात आले आहे. या अभ्यासानुसार, 70 टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांनी त्यांच्या ‘इनव्हर्टर एसी’चा वापर 8 तासांपेक्षा जास्त काळ केला, तर वीक-एंडच्या काळात, 60 टक्के ग्राहकांनी त्यांचे ‘इन्व्हर्टर एसी’ 12 तासांपेक्षा जास्त काळ चालवले.
‘एअर कंडिशनर्स’च्या नवीन श्रेणीच्या सादरीकरणाविषयी ‘व्होल्टास लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्षी म्हणाले, “एअर कंडिशनर्समधील अग्रगण्य ब्रॅण्ड म्हणून आम्ही देशभरातील आमच्या ग्राहकांना परवडणारे व सहजी उपलब्ध असे तंत्रज्ञान पुरविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. आमच्या ‘महा-अॅडजेटेबल इन्व्हर्टर एसी’च्या नवीन श्रेणीच्या माध्यमातून, आम्ही एका उत्पादनात पाच वेगवेगळ्या टन क्षमतांचे पर्याय देऊन ग्राहक-केंद्रीततेच्या भावनेस मूर्त रुप देत आहोत. आराम आणि उर्जेची बचत या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता या श्रेणीतून होणार आहे.”
‘अॅडजस्ट’ करणे या भारतीयांच्या सांस्कृतिक अंतर्दृष्टीच्या आधारे, व्होल्टासच्या ’महा-अॅडजेस्टे”बल इन्व्हर्टर एसी‘मध्ये फ्लेक्झिबल एअर कंडिशनिंग’ हे एक अनोखे वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ‘एसी’मधील टन क्षमतांचे एकाहून अधिक पर्याय निवडता येतात. वातावरणातील उष्मा किंवा खोलीतील व्यक्तींची संख्या यांच्या आधारावर, ग्राहकांना 0.75 टन, 1 टन, 1.2 टन, 1.5 टन किंवा 2 टन यांपैकी एका पर्यायाची निवड करण्याची क्षमता मिळते. त्यातून त्यांना एसी चालवण्याचा खर्च कमी करून बचत साधता येते.
‘व्होल्टास’च्या 2021मधील एसी उत्पादनांच्या श्रेणींमध्ये 130हून अधिक एसकेयू, ‘इनव्हर्टर एसी’मधील 95 एसकेयू, ‘स्प्लिट एसी’मध्ये 20 आणि ‘विंडो एसी’चे 20 एसकेयू, तसेच कॅसेट आणि टॉवर एसी यांचा समावेश आहे. यामध्येच ‘व्होल्टास’ने ‘महा-अॅडजेटेबल एसी’चे 24 एसकेयू सादर केले आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात ‘व्होल्टास’च्या एसींसाठी नवीन श्रेणींमध्ये अद्वितीय व रोमांचक ऑफर देण्यात येत आहेत –
· ‘इन्व्हर्टर कंप्रेसर’ची जीवनभराची हमी
· 5 वर्षाची सर्वसमावेशक हमी
· क्रेडिट कार्डाद्वारे आकर्षक ईएमआय
· बॅंकेतर वित्तकंपन्यांतर्फे शून्य टक्के व्याजदर
2021 या वर्षाच्या योजनेचा एक भाग म्हणून, ‘व्होल्टास’ने आपल्या ‘व्होल्टास फ्रेश एअर कूलर्स’चे वैयक्तिक, विंडो, टॉवर आणि डेझर्ट एअर कूलर्स या उप-श्रेणींमध्ये 48 एसकेयू सादर केले आहेत. या नव्या श्रेणीमध्ये, चारही बाजूंनी थंडावा देणारा ‘विंडसर’, स्टाईल व अल्ट्रा कूलिंग देणारा ‘एपिकूल’, दणकट मेटल बॉडी असलेला ‘विराट’ आणि शुद्ध हवेचा लाभ देणारा ‘अल्फा फ्रेश’ अशा या प्रकारांचा समावेश आहे. व्यावसायिक रेफ्रिजरेशन उत्पादनांचे 60 एसकेयू सादर करून कंपनीने आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत केला आहे. या उत्पादनांमध्ये, ‘कन्व्हर्टिबल फ्रीझर’, ‘फ्रीझर ऑन व्हील’ आणि ‘कर्व्हड ग्लास फ्रीझर’ यांचा समावेश आहे. वॉटर डिस्पेन्सर्सचे 22 एसकेयू व वॉटर कूलर्सचे 25 एसकेयूदेखील कंपनीने सादर केले आहेत. या वर्षी ‘व्होल्टास’तर्फे ‘बी-2-बी सेगमेंट’साठी शीतगृहांची श्रेणीही सादर करण्यात येत आहे.
‘व्होल्टास महा-अॅडजेटेबल इन्व्हर्टर एसी’ची प्रमुख वैशिष्ट्ये:
· मल्टी अॅडजेटेबल मोड : टन क्षमतेच्या अनेक पर्यायांमध्ये इंटेलिजेंट स्विचिंग, वातावरणातील उष्मा आणि खोलीतील व्यक्तींची संख्या यांवर आधारीत.
· सुपर यूव्हीसी : शुद्ध हवा देणारा एसी. या श्रेणीमध्ये, सुपर यूव्हीसी तंत्रज्ञान आणि टीओओ2 कोटेड एअर फिल्ट्रेशन सिस्टीम.
· सुपरड्राय मोड : ‘क्विक डीह्युमिडीफिकेशन’द्वारे खोलीतील आर्द्रतेच्या पातळीवर नियंत्रण.
· पर्यावरणास अनुकूल रेफ्रिजरेटर : पर्यावरण-अनुकूल अशा ग्रीन आर32 रेफ्रिजरंटचा वापर.
· उच्च वातावरणीय शीतकरण : 52 अंश सेल्सिअस तपमानातही वापरकर्त्यास मिळतो आराम.
‘व्होल्टास फ्रेश एअर कूलर्स’ची प्रमुख वैशिष्ट्ये:
· स्मार्ट आर्द्रता नियंत्रक : हवेतील आर्द्रता अॅडजस्ट करतो.
· डास प्रतिरोधक : डासांच्या प्रजननास प्रतिरोध करून त्यांना दूर ठेवतो.
· टर्बो एअर थ्रो : मोठ्या आकाराच्या पंख्याने हवा जास्त फेकली जाऊन, मोठी जागा होते थंड.
· प्री सोकिंग : पंखा सुरू होण्यापूर्वी, हनीकॉम्ब पॅड्स थंड करून, ताजी व थंड हवा सोडतो.
· हनीकॉम्ब कूलिंग पॅड्स : अधिक टिकाऊ, एकसमान थंडावा देतात, धूळ व गाऴ जमा होऊ देत नाही
‘व्होल्टास बेको होम अप्लायन्सेस’ची प्रमुख वैशिष्ट्ये:
रेफ्रिजरेटर:
· स्टोअरफ्रेश + तंत्रज्ञान : फळे आणि भाज्या राहतात 30 दिवस ताज्या
· निओफ्रॉस्ट ड्युअल कूलिंग टेक्नॉलॉजी : क्रिस्परच्या वरपासून खालपर्यंतच्या भागांत एकसमान तपमान राखते. कंपार्टमेंट्समधील गंध एकमेकांत मिसळणार नाही, याची खात्री करते.
· अॅक्टिव्ह फ्रेश ब्लू लाइट टेक्नॉलॉजी : नैसर्गिक प्रकाशयोजनांच्या परिस्थितीचे अनुकरण करते, अन्नपदार्थ ताजे ठेवते.
वॉशिंग मशीन :
· स्टेन एक्सपर्ट फंक्शन : 26 प्रकारचे भारतीय डाग दूर करण्यात मदत करते.
· स्टीम वॉश : कपड्यांवरील मळ मऊ करते, सुरकुत्या सरळ करते आणि कपडे स्वच्छ करते.
· प्रोस्मार्ट इनव्हर्टर मोटर : कमी ऊर्जा वापरून वॉशिंग मशीनची कार्यक्षमता वाढवते, ब्रशलेस मोटरमुळे कमी घर्षण होते.
· भारताचे पहिले 5 स्टार : सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन.
‘व्होल्टास बेको’ या नवीन होम अप्लायन्सेस जेव्ही ब्रँडच्या माध्यमातून, 2021 मध्ये अनेक नवीन उत्पादने सादर करणे व आपला पोर्टफोलिओ मजबूत करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ‘स्टोअरफ्रेश’ तंत्रज्ञानाच्या रेफ्रिजरेटर्ससह विविध डिझाईन व रंग यांच्या नमुन्यांमध्ये ‘फ्रॉस्ट फ्री’ श्रेणीचे फ्रीज ग्राहकांना यामध्ये मिळतील. सानंद येथील कारखान्यातील ‘डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर’चा पोर्टफोलिओ सादर केला जाणार आहे. यामध्ये ‘अॅक्टिव्ह फ्रेश ब्लू लाइट’ आणि ‘रॅपिड कूलिंग’ ही वैशिष्ट्ये, सर्व प्रकारचे आकार आणि ‘स्टॅंडर्ड बीईई स्टार रेटिंग’ यांचा समावेश असणार आहे. ‘हार्वेस्ट फ्रेश’ व ‘स्टोअर फ्रेश’ या ‘फ्रॉस्ट फ्री’ रेफ्रिजरेटर्सची श्रेणी या वर्षी सादर करण्यात येणार आहे. त्यांत उद्योग परिभाषित वैशिष्ट्ये व अनोख्या पेटंट तंत्रज्ञानाचा सेट असणार आहे.
ब्रॅंडच्या गुणवत्तेशी कटिबद्धता आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देण्याची बांधिलकी, या अनुषंगाने व्होल्टास बेको यंदा नाविन्यपूर्ण उपकरणे सादर करणार आहे. या उपक्रमानुसार, या ब्रँडने ‘5 स्टार रेटिंग’चे ‘टॉप लोड वॉशिंग मशीन’ सादर करण्याचे नियोजन केले आहे. त्यात ‘फाउंटेन वॉश’ आणि ‘अॅडजेस्टेबल जेट फंक्शन’ यांसारखी उद्योग-परिभाषित यूएसपी आहेत. ‘सेमी-ऑटोमॅटिक ट्विन टब’ प्रकारात, ‘स्टेनलेस-स्टील टब मशीन’ आणि ‘हायजीन बूस्ट’ मालिका ब्रॅंडतर्फे सादर होणार आहे. वॉशिंग मशीनच्या संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये आता 7.5 ते 14 किलो क्षमतांची मशीन्स असणार आहेत. ‘सेमी-ऑटोमॅटिक ट्विन टब’ प्रकारातील सर्व उत्पादनांना 5 स्टार रेटिंग आहे. सोलो, ग्रिल आणि कन्व्हेक्शन विभागातील मायक्रोवेव्ह ओव्हन श्रेणीचादेखील विस्तार करण्यात येत आहे. तसेच, अतिशय यशस्वी झालेल्या डिश-वॉशर श्रेणीमध्येही आणखी उत्पादने आणण्यात येणार आहेत.