राजकारण

सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलनात गोळीबार

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री काही अज्ञातांनी सिंघू बॉर्डरवर गोळीबार केल्याची भयंकर घटना घडली आहे. टीडीआय सिटी जवळीव लंगरमध्ये जेवणाच्या बहाण्याने कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी लंगरच्या ठिकाणी गोळीबार केला आणि ते पसार झाले आहेत. कुंडली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगड येथील असणाऱ्या ऑडी कारमधून काही अज्ञात हल्लेखोर आले होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणाचा आणि पाणी पिण्याचा बहाणा केला होता. त्यानंतर अज्ञातांनी घटनास्थळावरच हवाई गोळीबार केला आहे. तसेच थोड्या अंतरावर जावून तीन वेगवेगळ्या ठिकाणी हवेत गोळीबार केला आहे. शेतकरी आंदोलनात अशाप्रकरे हवाई गोळीबार होणं, एक गंभीर गोष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी रात्री उशिरा एका वाहनातून आलेल्या काही अज्ञातांनी टीडीआय सिटीसमोरील सिंघू सीमेसमोर हवेत गोळीबार केला आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांत अंतर्गत वादाला सुरुवात करण्यासाठी हे कृत्य केलं असावं. हे कृत्य एका मोठ्या राजकीय षडयंत्राचा भाग असू शकतो. हे तरुण पंजाबमधील असल्याचं सांगण्यात येत होतं, तर त्यांनी हरियाणाच्या शेतकऱ्यांशी वाद घातला. पोलिसांनी या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यासाठी विशेष पथकंही तयार करण्यात आली आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेवून तपास केला जात आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असं म्हटलं आहे.

“गेल्या 15-20 दिवसांपासून सरकार गप्प आहे. सरकार कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची तयारी आहे. केंद्राचे नवीन कृषी कायदे लागू होत नाही तोपर्यंत दिल्लीतून मागे हटणार आहे. आंदोलन कधी संपवायचं या निर्णय आता केंद्र सरकारने घ्यायचा आहे. तसेच सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यास शेतकरी आपल्या गावी परततील. असं झालं नाही तर शेतकरी शेतीही पाहतील आणि आंदोलनही करतील” असं देखील राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button