मुंबई : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉलीवूड चित्रपट निर्माते पराग संघवी याला फसवणूक केल्या प्रकरणी अटक केली. न्यायालयाने संघवीला २५ डिसेंबरपर्यंत पोलीस ईओडब्ल्यू कोठडी सुनावली आहे. आ गु वि गु नों क्र १०९/२०१८, कलम ४०९,४२०,४६५,४६७,४७१,१२०(ब),३४ भा दं वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३,७४,००,००० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पराग संघवीवर आहे. महेंद्र राणमल शाह यांनी पराग संघवीवर हे आरोप केले आहेत. पराग संघवी हा बॉलिवूडमधील सिने निर्मिता आहेतच मात्र त्याचबरोबर अलुमब्रा आणि लोट्स फिल्म कंपनीचा ते सीईओ देखील आहे. भूतनाथ रिटर्न्स, द अटॅक ऑफ २६/११ या सिनेमांची त्यांनी निर्मिती केली आहे. कमला मिल ग्रुप ऑफ कंपनीच्या संबंधीत एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.
पराग संघवी हे अलुमब्रा ग्रुपचे सीईओ आहेत आणि कमला ग्रुप ऑफ कंपनीची अलुमब्रा कंपनी ही सिस्टर कंपनी आहे. कमला ग्रुप कंपनीने लोकांडून पैसे घेतले आणि ते पैसे अलुमब्रा, प्लेबॉय आणि आणखीन एका कंपनीमध्ये ते पैसे वळवले. एकूण ४२ कोटी रुपये कमला ग्रुप ऑफ कंपनीजमधून बाकीच्या तीन कंपनीमध्ये ते वळवण्यात आले. प्लेबॉय आणि अलुमब्रा कंपनीमध्ये पराग संघवी हे डायरेक्टर पदावर आहेत. तर कमला ग्रुप ऑफ कंपनीचे डायरेक्टर जितेंद्र जैन सुद्धा प्लेबॉय आणि अलंगुरा कंपनीमध्ये पराग संघवी सोबत डायरेक्टर आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने मध्ये पराग संघवीविरुद्ध एकूण पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक पुण्यामध्ये असून पराग संघवीला अटक करण्यात आली आहे.
कमला कृपा कंपनीचे डायरेक्टर जितेंद्र जैन यांना सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती, मात्र चार वर्षांच्या तुरुंगवासा नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. कमला ग्रुप ऑफ कंपनीज मे लोकांच्या पैशाचा अपहार केला आणि ते पैसे इतर तीन कंपनी मध्ये वळवले ज्यात पराग संघवी हे डायरेक्टर होते लोकांच्या पैशाचा अपहार झाला हे माहिती असून सुद्धा आपल्या कंपनीमध्ये पैसे वळून त्या पैशांचा वापर केल्याप्रकरणी पराग संघवीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे..