डिस्कव्हरी+ वर ‘से येस टू द ड्रेस’

मुंबई : स्वप्नातला विवाह पोशाख शोधणे सोपे नसते. परंतु ह्या विवाह काळात भारतातील वधूंना से येस टू द ड्रेस ही संधी मिळाली आहे, कारण डिस्कव्हरी+ ने ह्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फ्रँचायजीला भारतामध्ये आणले आहे. दर्जेदार सिल्हूएटसपासून अविश्वसनीय डिझाईन्सपर्यंत होणा-या वधूंच्या सर्व लहरी व पसंतींसह त्या त्यांच्या स्वप्नातील आउटफिटला प्रत्यक्षात येताना नक्की पाहा. डिस्कव्हरी+ वर सादर होणा-या से येस टू द ड्रेस इंडिया ह्या मालिकेचा ट्रेलर डिस्कव्हरी+ ने जारी केला. ह्या शो मध्ये भारतातील विविध संस्कृती व परंपरांची झलक दाखवताना फॅशन, नाट्य, मनोरंजन आणि भावनांचे सुंदर चित्रण घडेल.
ह्या आठ भागांच्या मालिकेमध्ये भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीमधील वेगवेगळी आवड असलेल्या व त्यांच्या आयुष्यात त्या परिधान करतील त्या सर्वाधिक महत्त्वाच्या पोशाखाच्या शोधात असलेल्या वधूंच्या मनोरंजक कहाण्या दाखवल्या आहेत. काहींना त्यांच्या स्वप्नातील पोशाख हा उठून दिसणारा आणि बोल्ड हवा आहे तर काहींना पारंपारिक साज हवा आहे. त्यामध्ये अशा प्रकारे वधुच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे दर्शन घडते. पोशाखावर होणा-या सांस्कृतिक परिणामांना दर्शवत वधुच्या लूक्समधील वैविध्य दर्शवत विवाहातील घटक व कार्यक्रमांना सादर केले जाईल. वधू कितीही वेगळ्या असल्या, तरी त्या सर्वांसाठी एक गोष्ट कॉमन आहे व ती म्हणजे रंग, अद्ययावत ट्रेंडस, डिझाईन्स व फॅब्रिक ह्या सर्वांचे बहुरंगी मिश्रण ज्यामधून भारतीय वधूंच्या फॅशनचे वास्तविक दर्शन घडते.

ह्या अनुभवाला आणखी स्वप्नवत करण्यासाठी, डिस्कव्हरी+ ने नीता लुल्ला, अभिनव मिश्रा, वरुण बहल, नताशा दलाल, संदीप खोसला, जारा उम्रीगर, शुबिका, अंगदी सारी, मोनिका जेद, सीमा गुजराल, संजय गर्ग, कार लिओ, एशदीन, अंजु मोदी, दिलनाज़, हीना कोच्चर आणि राहुल मिश्रा सह इतरांसह भारतातील प्रथितयश फॅशन डिझायनर्सना एकत्र आणले आहे. हे सगळे वधूंना विविध प्रसंगांसाठीचा त्यांच्या स्वप्नातील आउटफिट निवडण्यासाठी मदत करतीलच असे नाही, तर ते त्यांच्यासाठी ते बनवूनही देतील. आणि ही मजा इथेच संपत नाही, ही मालिका दिव्यक डिसूझा हॉस्ट करणार आहे ज्याने फरहान अक्तर, चित्रांगदा सिंह, रवीना टंडन व इतर अनेकांसह बॉलीवूड सेलिब्रिटीजची स्टाईल बनवली आहे व तो फॅशन उद्योगामध्ये कन्सल्टंट, फॅशन एडिटर व ब्रायडल स्टायलिस्ट म्हणून काम करतो. ह्या पार्श्वभूमीसह दिव्यक विवाहातील पोशाखाच्या शॉपिंगसंदर्भातील डिझायनर्सचा शोध ते ओव्हरबीअरिंग एंटूअरेजेस हाताळण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये नववधूंना मदत करण्यासाठी समर्थ आहे.
आमच्या जीवनशैलीच्या दालनामध्ये विस्तार करताना आणि भारतामध्ये से येस टू द ड्रेस ह्या अतिशय सफल फ्रँचायजीला आणताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे व ह्या मालिकेमध्ये लेटेस्ट फॅशन ट्रेंडस, नाट्य, वेडेपणा आणि मनोरंजनाचा धमाका असेल व त्यामुळे आम्हांला खात्री आहे की, दर्शक प्रत्येक भाग परत परत बघतील. निर्णय न घेता येणा-या वधूपासून बोल्ड निर्णय घेणा-या वधुपर्यंत ह्या शोमध्ये वैविध्याचा समावेश आहे आणि प्रत्येक वधू वेगळी असते, हे समोर येईल, असे डिस्कव्हरी कम्युनिकेशन्स इंडियाच्या साउथ एशिया मॅनेजिंग डायरेक्टर मेघा टाटा ह्यांनी म्हंटले.
आपल्या वधुच्या पोशाखाच्या फॅशन लाईनमध्ये ओटीटीमध्ये पदार्पण करत असल्याबद्दल डिझायनर नताशा दलाल ह्यांनी म्हंटले, डिझाईनिंगची मला नेहमीच आवड होती आहे आणि माझे ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम संधी मिळाली नसतील. से येस टू द ड्रेस हा जगभर अतिशय नावाजला गेलेला शो आहे आणि त्याचा भाग बनणे हा विलक्षण अनुभव आहे! वधूसाठी स्वप्नातील पोशाख बनवणे हा माझ्यासाठी इतका बहुमान आहे. प्रत्येक वधू वेगळी असते आणि जेव्हा तिच्यासमोर तिच्या स्वप्नातला आउटफिड येतो, तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये येणारी झळाळी मी बघते तेव्हा तो पोशाख घडवण्यासाठीचे सर्व प्रयत्न सार्थक होतात. पोशाखाला येस म्हणण्याच्या अगदी आधी वधुला काय वाटते ह्याची झलक दाखवण्यामध्ये सफल ठरलेल्या ह्या शोचा भाग बनून मला अतिशय आनंद झाला आहे!
हा अगदीच साधासुधा कार्यक्रम असणार नाही तर त्यामध्ये अश्रूही दिसतील, कारण ह्या मुली त्यांच्या आयुष्यात त्या परिधान करतील त्यातल्या सर्वांत मौल्यवान ड्रेसच्या शोधात असतील. डिस्कव्हरी+ वरच ह्या वधू कधी व कशाला सहमत होऊन ‘से येस टू द ड्रेस’ म्हणतील हे बघायला मिळेल.




