मनोरंजन

स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ मालिकेत लगीनघाई

मुंबई : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सांग तू आहेस का’ मध्ये लवकरच स्वराज आणि कृतिकाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. मात्र या लग्नातही मोठा ट्विस्ट दडलेला आहे. डॉ वैभवीला स्वराजपासून दूर ठेवण्यासाठी सुलू हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. लग्नात तर तिने वैभवीला जीवे मारण्याचा घाटच घातला आहे. वैभवीचा जीव वाचवण्यात स्वराज यशस्वी होणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

लग्नातला हा ट्विस्ट उत्कंठावर्धक आहेच पण स्वराज वैभवीच्या रॉयल लग्नासाठी त्यांचा खास लूक डिझाईन करण्यात आला आहे. पारंपरिक नऊवारी साडीतील कृतिका आणि डिझायनर शेरवानी परिधान केलेला स्वराजचा लूक लक्ष वेधून घेत आहे. छोट्या पडद्यावरच्या आजवरच्या लग्नसोहळ्यांमधला हा रॉयल आणि हटके लूक आहे. वेशभूषाकार संपदा महाडिकने हा खास लूक डिझाईन केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर काही दिवसांपूर्वीच मिताली मयेकरसोबत विवाहबंधनात अडकला. आता पुन्हा एकदा मालिकेतल्या लग्नासाठी तो सज्ज झाला आहे. सिद्धार्थ साकारत असलेल्या स्वराज या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेतल्या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘सांग तू आहेस का’ मालिकेतलं पुढचं वळण मनोरंजनाची पर्वणी ठरेल यात शंका नाही. त्यासाठी पाहायला विसरु नका ‘सांग तू आहेस का’ सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button