मनोरंजन

अभिनेत्री शिवानी रांगोळेचा नृत्याविष्कार

‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या सीनसाठी शिवानी थिरकली सदाबहार गाण्यावर

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचं उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या कसदार अभिनयामुळे मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेच्या एका खास सीनच्या निमित्ताने नुकतंच अभिनेत्री शिवानी रांगोळेने एका सदाबहार गाण्यावर नृत्य सादर केलं. शिवानी कथ्थक शिकली असली तरी तिची नृत्याची ही आवड काहीशी मागे पडली होती. सांग तू आहेस का मालिकेच्या निमित्ताने जवळपास ८ वर्षांनी तिने नृत्य सादर केलं. मालिकेतली तिची सहकलाकार सानिया चौधरीने या खास गाण्याची कोरिओग्राफी केली होती. या गाण्यावर नृत्य करताना अतिशय आनंद झाल्याची भावना शिवानीने व्यक्त केली.

‘सांग तू आहेस का’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वैभवीला जीवानीशी मारल्यानंतर आता सुलक्षणा स्वराज आणि डॉ. वैभवीच्या देखिल जीवावर उठली आहे. या कठीण काळात वैभवी स्वराजचा जीव कसा वाचवणार हे पहाणं उत्सुकतेचं असणार आहे. त्यासाठी पाहायला विसरु नका सांग तू आहेस का सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button