मनोरंजन

‘रंगीला गर्ल’ 12 वर्षांनी करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. आगामी चित्रपटातून लवकरच उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2019 साली त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता.

सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहेत. उर्मिला मातोंडकर गेली कित्येक वर्षे चित्रपटसृष्टीपासून लांब होत्या. 2019 साली त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीत परत येतील की नाही? अशा चर्चा होत होत्या. त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात माहिती देत सांगितलं की, त्यांचा हा चित्रपट लोकांच्या विश्वासावर उभा राहिल.

उर्मिला मातोंडकरने सांगितले की, त्या लवकरच एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यानिमित्ताने त्या मोठ्या पडद्यावर पुन्हा पर्दापण करणार आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्या वेबसिरिजचा देखील भाग होणार आहे. परंतु त्या वेबसीरिजचं शूटिंग कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर गेलं होतं. ही वेबसिरिज एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झालं नाही. लॉकडाऊनमुळे शूटिंगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुलाखतीदरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले की, “मला असं वाटतयं हिच योग्यवेळ आहे. बॉलिवूडमध्ये दुसऱ्यांदा पदार्पण करण्याची. जेव्हा मी माझ्या करिअरबद्दल विचार करते तेव्हा असं वाटतं की, मी प्रेक्षकांच्या हृदयात माझी जागा निर्माण केली आहे. माझ्या आतापर्यंतच्या करिअरचा प्रवास खूप शानदार झालेला आहे. माझे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. मला माहित नाही माझे पुढचे काम किती यशस्वी होईल कारण याबद्दल मी विचार केलेला नाही.”

उर्मिला मातोंडकरने 90च्या दशकात अनेक मोठे निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत काम केले होते. पण त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉईंट राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या रंगीला चित्रपट ठरला. आजही उर्मिला मातोंडकर यांना रंगीला गर्ल म्हणून ओळखलं जातं. उर्मिलाने 1980 साली श्रीराम लागू यांच्या ‘जाकोल’ या मराठी चित्रपटातून केली होती. त्यावेळी उर्मिला मातोंडकर या केवळ 6 वर्षांच्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button