Top Newsमनोरंजन

शिल्पा शेट्टीच्या घरात पोलिसांना सापडले महत्वाचे धागेदोरे; आता बँक खात्याची चौकशी

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात शुक्रवारी सकाळपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरात गुन्हे शाखेकडून झाडाझडती सुरू होती. गुन्हे शाखेकडून तिचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. या वृत्ताला गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच तिच्या बँक खात्याचीही लवकरच चौकशी होणार असल्याचेही समजते.

पोर्नोग्राफी प्रकरणातील एका कंपनीत शिल्पा शेट्टीचीही भागीदारी होती; मात्र २०२० मध्ये तिने या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. तसेच या कंपनीतून आतापर्यंत किती जणांनी आणि कुठल्या कारणांमुळे राजीनामा दिला, याबाबत संबंधितांकडे चौकशी करत जबाब नोंदविण्यात येत आहेत. राज कुंद्रा यांच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज मिळाल्यानंतर शुक्रवारी शिल्पाच्या जुहू येथील घरी गुन्हे शाखेने झाडाझडती सुरू केली. त्यावेळी महत्वाची माहिती पोलिसांना मिळाली असून याचदरम्यान शिल्पाचाही जबाब नोंदविण्यात आला. पोर्नोग्राफीबाबत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला काही माहिती होती का? यासह विविध प्रश्नांबाबत तिच्याकडे विचारणा करण्यात आली. पोर्नोग्राफीतील पैसे शिल्पा शेट्टी यांच्याही बँक खात्यात गेले आहेत का, हे शोधण्यासाठी त्यांची बँक खाती तपासण्यात येणार आहेत. तसेच कुंद्रा यांच्यासोबत कुठल्या कंपनीत त्यांची भागीदारी आहे का, याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button