‘सोशल आंत्रप्रेनर ऑफ दि इयर (एसईओवाय) – इंडिया अवॉर्ड २०२१’च्या १२व्या आवृत्तीसाठी प्रवेशिका सुरू

मुंबई : जुबिलंट भारतीय फाऊंडेशन आणि श्वाब फाऊंडेशन फॉर सोशल आंत्रप्रेनरशिप या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भगिनी संस्थेने सोशल आंत्रप्रेनर ऑफ दि इयर (एसईओवाय)- इंडिया अवॉर्ड २०२१ या वार्षिक पुरस्कारांच्या १२व्या आवृत्तीसाठी प्रवेशिका खुल्या होण्याची घोषणा केली आहे. २०१० मध्ये श्वाब फाऊंडेशन फॉर सोशल आंत्रप्रेनरशिप आणि ज्युबिलंट भारतीय फाऊंडेशन यांनी भारतात सोशल आंत्रप्रेनरशिप पुरस्कारांद्वारे सामाजिक नवप्रवर्तनाला चालना देण्यासाठी एकत्र यायचे ठरवले होते.
सोशल आंत्रप्रेनर ऑफ दि इयर (एसईओवाय)- इंडिया अवॉर्ड २०२१ पुरस्कारांसाठी अर्ज प्रवेशिका ३० एप्रिल २०२१ पर्यंत स्वीकारली जाईल. स्वारस्य असलेले उमेदवार jubilantbhartiafoundation.com येथे उपलब्ध असलेले अर्ज दाखल करू शकतात किंवा भरलेला अर्ज jbf_seoy@jubl.com येथे इमेल करू शकतात.
सोशल आंत्रप्रेनर ऑफ दि इयर (एसईओवाय)- इंडिया अवॉर्ड २०२१ च्या विजेत्यांची घोषणा ७ ऑक्टोबर २०२१ रोजी केली जाईल.
हा पुरस्कार अशा व्यक्ती तसेच संस्थांचा गौरव करतो, ज्या भारतात सर्वसमावेशक वाढ सत्यात उतरवण्यासाठी वंचित असलेल्या समुदायांना भेडसावणाऱ्या समस्यांवर नावीन्यपूर्ण, शाश्वत आणि गणनयोग्य उपाययोजना आणतात. त्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत- जसे आरोग्य, शिक्षण, रोजगार, पाणी, स्वच्छ ऊर्जा, ओळख निर्माण आणि मालकी, आर्थिक साक्षरता, माहिती आणि तंत्रज्ञान प्राप्त करून देणे.
सहभागी व्यक्ती आणि संस्थांचे मूल्यमापन बाजारावर आधारित, तंत्रज्ञानाने युक्त, शाश्वतता, थेट सामाजिक प्रभाव, पोहोच आणि व्याप्ती, प्रतिबिंबित्व या तत्त्वांवर केले जाईल. अंतिम फेरीतील स्पर्धकांची निवड मोठ्या शोध आणि निवड प्रक्रियेद्वारे केली जाईल. त्यात तज्ञांची मते आणि साइट भेटींचाही त्यात समावेश असेल. विजेत्यांची निवड प्रतिष्ठित प्रशिक्षकांकडून केली जाईल. त्यात सरकार, व्यवसाय, प्रसारमाध्यमे आणि नागरी समाजातील प्रमुख नेते आणि व्यावसायिकांचा समावेश असेल.
एसईओवाय इंडियाचे विजेते श्वाब फाऊंडेशन फॉर सोशल आंत्रप्रेनरशिपशी जोडलेल्या सामाजिक उद्योगांच्या जगातील सर्वांत मोठ्या नेटवर्कशी जोडले जातील. त्यातून ते सामाजिक उद्योगात सहभागी होतील, त्यांची उभारणी करतील आणि शाश्वतता आणतील. विजेत्याला दरवर्षी एका दिमाखदार सोहळ्यात एका दिग्गज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात येईल.
सोशल आंत्रप्रेनर ऑफ दि इयर (एसईओवाय) इंडिया पुरस्कारांचे उद्दिष्ट आघाडीच्या सामाजिक उद्योजक आणि त्यांच्या भारतातील विशेष उद्योगांना चालना देणे व साजरे करण्याचे आहे, जेणेकरून आपल्या समाजातील तसेच देशातील विविध प्रकारच्या दरी सांधली जाण्यास मदत होईल. ओळख निर्माण करण्यातून एसईओवाय इंडिया अवॉर्ड भारतात दरवर्षी इतर अनेक संभाव्य सामाजिक उद्योजकांना प्रेरणा देण्याची आशा ठेवत आहे.