शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची छापेमारी
जालना : माजी मंत्री आणि जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी ईडीने (सक्तवसुली संचालनायलय) छापेमारी केली आहे. तसेच सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ईडीकडून तपासणीही करण्यात आली आहे. १२ जणांच्या पथकाकडून सकाळी साडेवाठ वाजल्यापासून खोतकर यांच्या घरी ईडीकडून तपासणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद मधील एका उद्योजक आणि व्यावसायिकाच्या घरी ईडीने केलेल्या छापेमारीचं कनेक्शन खोतकरांशी असल्याचं समजतेय. जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात खोतकरांचा संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप. त्या पार्श्वभूमीवर ईडीने खोतकर यांच्या घरी छापा मारत तपासणी केली.
किरीट सोमय्या यांचे आरोप काय होते?
२०१२ साली टेंडर काढण्यात आले. नुसत्या जमिनीची रेडीरेकनर व्हॅल्यू ७० कोटी रुपये असताना व्हॅल्यूअरला मॅनेज करून संपूर्ण कारखान्याची लँड, प्लॉट, आणि मशिनरी प्राईस फक्त ४२ कोटी ठेवण्यात आली. महाराष्ट्र सरकारचे शंभर एकर जमीन एमएससी बँकेकडे नसतानासुद्धा विकण्यासाठी काढली, खोतकर यांच्या संबंधित तीन कंपन्यांनी यासाठी टेंडर भरले. औरंगाबाद मध्ये छापा टाकण्यात आलेल्या एका उद्योजकाचे आणि व्यावसायिकाचे खोतकर यांच्यशी साखर कारखान्याच्या माध्यमातून अर्थपूर्ण संबंध असल्याचा सोमय्याचा आरोप. औरंगाबादमधील एका उद्योजकाने ४३ कोटींचा कारखाना अर्जुन खोतकर यांच्या अर्जुन सीडस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला २७.५८ कोटी रुपयांना विकला.