Top Newsराजकारण

संजय राऊतांनी राहुल गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर केली चर्चा?

नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली अक्षरश: चिरडलं गेलं. त्याचा एक व्हिडीओही अनेक नेत्यांनी ट्वीट केलाय. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. राजधारी दिल्लीत ही भेट झाली. यावेळी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.

राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. प्रत्येक गोष्टी मी सांगू शकत नाही. काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले. लखीमपूरला विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ जाणार का? असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला. त्यावेळी याबाबतही चर्चा झाली आहे. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल, असं राऊत म्हणाले. देशात लोकशाही उरली आहे का? देशात जे काही सुरु आहे त्यावर आम्ही चर्चा केली. लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. राहुल गांधींसोबत राजकीय चर्चा झाली. आता विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मतही संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलंय.

लखीमपूर हिंसाचारामुळे देश हादरला आहे. प्रियंका गांधी यांना यूपी सरकारनं अटक केलीय. विरोधी नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात येतोय. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या दडपशाही विरोधात संयुक्त विरोधी कारवाईची गरज आहे. राहुल गांधी यांना भेटणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button