प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा विषय आमच्यासाठी संपला : फडणवीस
मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वक्तव्य केल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, पण अंगावर आलं तर सोडत नाही, अशा इशारासुद्धा त्यांनी दिलाय.
मुंबईमध्ये भाजप कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनाविषयी बोलताना चिथावणीखोर वक्तव्य केलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडीओ काढून स्पष्टीकरण दिलं आहे. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही; पण अंगावर आलं तर सोडत नाही, असं फडणवीस म्हणाले.