राजकारण

सुजय विखे अडचणीत; रेमडेसिव्हीर इंजेक्शनप्रकरणी हायकोर्ट आक्रमक; सरकारला कारवाईचे आदेश

मुंबई/औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची तुटवडा निर्माण झाला आहे. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतून एका खासगी विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचे बॉक्स आणले होते. यावरुन सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शन बेकायदेशीरपणे आणल्यामुळे त्यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीतून रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला होता यानंतर जिल्ह्यातील रुग्णालयांत या रेमडेसिवीरचे वाटप करण्यात आले याबाबत काही पुरावा दिला नसल्यामुळे अरुण कडू यांच्यासह तीन जणांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे.

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे ही औषधे तत्काळ ताब्यात घ्यावीत आणि त्याचं योग्यप्रकारे कायदेशीर गरजूंना वाटप करण्यात यावं अशीही मागणी याचिकार्त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने या याचिकेची दखल घेतली आहे. इतकंच नाही तर राज्य सरकारला योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत, अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड प्रज्ञा तळेकर यांनी दिली. रेमडेसिव्हीर इंजेक्शन प्रकरणी गुन्हा का दाखल केला जाऊ नये अशी विचारणा न्यायालयाने केली आहे. २९ तारखेपर्यंत समर्पक उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रेमडेसिव्हीरच्या काळाबाजराची न्यायालयाला शंका आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button