स्पोर्ट्स
दिल्ली कॅपिट्ल्सचा पंजाबवर ७ गडी राखून शानदार विजय

अहमदाबाद : दिल्ली कॅपिट्ल्सने पंजाब किंग्सवर ७ गाडी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने दिल्लीला विजयासाठी १६७ धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने १७.४ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केलं. दिल्लीकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक ६९ धावांची नाबाद खेळी केली. तसेच पृथ्वी शॉने ३९ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने २४ धावांची खेळी केली. यासह दिल्लीने विजयी षटकार लगावला आहे. तसेच दिल्लीने पॉइंट्स टेबलमध्ये १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.




