Top Newsराजकारण

खडसे कुटुंबाकडून जीवाला धोका; शिवसेना आ. चंद्रकांत पाटलांचा आरोप

जळगाव : राज्यात एकीकडे महाविकास आघाडी तर जळगाव जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना आ. चंद्रकांत पाटील यांची चांगलीच जुंपली आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी चक्क जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडेच खडसे परिवाराकडून मला जीवास धोका असल्याची तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिल्यानं चांगलाच कलगीतुरा रंगला आहे

या वादाची सुरुवात बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान झालीय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा आम्ही आदर करतो आम्ही कुठल्या प्रकारे यांच्याशी शाब्दिक चकमक न केल्याचा खुलासा शिवसेनेने केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांना शिवसेनेनं देखील निवेदन दिले होते.

बोदवड येथील प्रचारादरम्यानचा वाद शांत होत नाही तोवर मुक्ताईनगरात पुन्हा शुक्रवारच्या मध्यरात्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक व मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार यांचे कट्टर समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी उडी घेतली. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबाबत आमदारांना चोप देण्याची भाषा वापरली.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले असून यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत, असा आरोप केला. एकनाथ खडसे यांच्या लोकांचे दोन नंबरचे धंदे असल्याचा आरोप पाटील यांनी केला. माझा दोन नंमबरच्या धंद्याशी रिलेशन क्लीअर करून घ्यावे ते म्हणतील ती शिक्षा भोगेलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या मुलीला जर महिला असुरक्षित नाहीत असं वाटत असेल तर त्यांच्या वडिलांन समोर एका कार्यक्रमादरम्यान सामाजिक कार्यकर्त्या महिलेला अश्लील बोलले जाते ते चालते का? असा सवाल पाटील यांनी केलाय. ही कुठली संस्कृती मला चोप देण्याची भाषा ते करतात एकेरी भाषेत माझं नाव घेत मला बदनाम करण्याचा षड्यंत्र त्यांच्याकडून सुरू आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button