आरोग्य

राज्यात कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली! २४ तासांत ८३२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : राज्यात एकाबाजूला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थोड्याप्रमाणात वाढत असलं तरी दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६६ हजार १९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८३२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४२ लाख ९५ हजार २७ वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६४ हजार ७६० जणांच्या मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर १.५१ टक्के एवढा आहे.

रविवारी नोंद झालेल्या एकूण ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २४४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२८ मृत्यू, पुणे-५३, औरंगाबाद-४३, नाशिक-२७, नांदेड-२३, सोलापूर-१८, अहमदनगर-१६, ठाणे-१५, नागपूर-१२, चंद्रपूर-६, रायगड-४, सिंधुदुर्ग-३, जळगाव-२, गडचिरोली-१, जालना-१, परभणी-१, रत्नागिरी-१, सांगली-१ आणि भंडारा-१ असे आहेत. आज दिवसभरात ६१ हजार ४५० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३५ लाख ३० हजार ६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१९ एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५७ लाख ४९ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४२ लाख ९५ हजार २७ (१६.६८) टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ३६ हजार ८२५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर अजूनही ६ लाख ९८ हजार ३५४ रुग्ण राज्यात सक्रीय आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button