मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाले; काँग्रेस खासदाराची घणाघाती टीका
चंद्रपूर : कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी ते मृतदेव गंगा नदीत टाकले गेल्याचं पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात तर बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीत हे मृतदेह तरंगताना पाहायला मिळाले. या घटनेनंतर दोन्ही राज्यातील सरकार खडबडून जागं झालंय. या प्रकारावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात ‘नमामि’ ऐवजी ‘शवामी गंगे’ झाल्याची टीका त्यांनी केली आहे.
गंगा नदीत आतापर्यंत शेकडो मृतदेह प्रवाहात वाहून आल्याचं गाझीपूर आणि बक्सरमध्ये दिसून आलं. त्यातील काही मृतदेह हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. त्यावरुन बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवत भारताची मान शरमेनं खाली गेल्याचं म्हटलंय. हा संपूर्ण भारतवासियांचा जगभरात झालेला अपमान आहे. कोरोना विरोधी लढ्यात मोदी सरकारनं विरोधी पक्षांना आणि त्यांच्या सुचनांना सामावून घेण्याचं आवाहनही धानोरकर यांनी केलंय.
प्रियंका गांधींचेही मोदींवर टीकास्त्र
खबरों के अनुसार बलिया, गाजीपुर में शव नदी में बह रहे है और उन्नाव में नदी के किनारे सैकड़ों शवों को दफना दिया गया है।
लखनऊ, गोरखपुर, झांसी, कानपुर जैसे शहरों में मौत के आंकड़े कई गुना कम करके बताए जा रहे हैं।उत्तर प्रदेश में हद से ज़्यादा अमानवीयता हो रही है।… 1/2 pic.twitter.com/0INuPPT7DS
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 13, 2021
गंगा नदीत आढळून आलेल्या मृतदेहांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. “मिळालेल्या माहितीनुसार बलिया, गाझीपूरमध्ये मृतदेह वाहून जात आहेत. तर उन्नावमध्ये नदी किनाऱ्यावर शेकडो मृतदेह पुरले जात आहेत. लखनऊ, गोरखपूर, झांरी, कानपूर, अशा शहरांमधील मृत्यूचा आकडा अनेक पटींनी कमी करुन सांगितला जातोय. उत्तर प्रदेशात मर्यादा ओलांडून अमानवतेचं दर्शन होत आहे. सरकार आपली प्रतिमा बनवण्यात व्यस्त आहे आणि जनतेचं दु:ख असह्य बनत चाललं आहे. या प्रकाराची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली न्यायिक तपास झाला पाहीजे, अशी मागणी प्रियंका यांनी ट्विटरद्वारे केलीय.
लाकडाची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेह गंगेत फेकले जातात
पावनी येथे राहणारे नरेंद्र कुमार मौर्य म्हणतात की, चौसा घाटाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कोरोना संसर्गामुळे येथे दररोज 100 ते 200 मृतदेह येतात आणि लाकडाची व्यवस्था नसल्यामुळे मृतदेह गंगेमध्ये फेकले जातात, यामुळे कोरोना संक्रमणाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातंय.