पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण निकाल
मुंबई : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तुणमूल काँग्रेसने हॅटट्रिक केली आहे. आसाममध्ये भाजपला सत्ता राखण्यात यश आलं आहे. केरळमध्ये एलडीएफने सत्ता राखली, तर तामिळनाडूत डीएमकेने मोठा विजय मिळवून सत्ता खेचून आणली. तिकडे पुद्दुचेरीमध्ये भाजपप्रणित एनडीएने काँग्रेसला धोबीपछाड दिली.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची हॅटट्रिक
पश्चिम बंगालमध्ये २९२ पैकी तृणमूलला २१३, भाजप ७७, काँग्रेस ०० आणि अन्य ०१ अशा जागा मिळाल्या. बंगालमध्ये बहुमतासाठी १४७ जागांची गरज आहे. मात्र तृणमूल काँग्रेसने २०० पेक्षा जास्त जागा मिळवून एकहाती सत्ता खेचून आणली आहे.
बंगालमधील पक्षीय बलाबल
तृणमूल काँग्रेस – २१३
भाजप – ७७
काँग्रेस – ००
डावे – ०१
एकूण – २९२
आसाममध्ये भाजपने गड राखला
आसाम विधानसभेच्या १२६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. आसाममध्ये भाजपला ६०, काँग्रेसला २९, आसाम गण परिषद ९, एआययूडीएफ १६, बोडोलँड पीपल फ्रंट ०४, युनायटेड पीपल्स पार्टी ०६ आणि अन्य २ अशा जागांवर विजय मिळाला.
तामिळनाडूमध्ये उलटफेर
तामिळनाडू विधानसभेत मोठा उलटफेर झाला आहे. सत्ताधारी एआयडीएमके ला मोठा झटका बसला आहे. डीएमकेने एकहाती सत्ता काबीज केली आहे. तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी निवडणूक झाली.
तामिळनाडूतील पक्षीय बलाबल
डीएमके – १३३
एआयडीएमके – ६६
काँग्रेस – १८
भाजप – ४
अन्य – १३
एकूण – २३४
केरळमध्ये डाव्यांनी गड राखला
केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफने पुन्हा डाव मांडला आहे. एक्झिट पोलमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एलडीएफने प्रत्यक्ष मतमोजणीतही आपला दबदबा कायम राखला. १४० जागांच्या केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एलडीएफने ९४, काँग्रेस आघाडी ३९, भाजप ०० आणि अपक्ष-इतर ०६ असं चित्र पाहायला मिळालं.
केरळमधील पक्षीय बलाबल
एलडीएफ – ९४
काँग्रेस आघाडी – ३९
भाजप – ००
इतर – ०७
एकूण – १४०
पुद्दुचेरी विधानसभा
पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला झटका बसला आहे. ३० सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजपप्रणित एनडीएने सत्ता स्थापनेच्या दृष्टीने पावलं टाकली.
पुद्दुचेरीमधील पक्षीय बलाबल
एनडीए -१६
काँग्रेस – ०२
डीएमके – ०६
इतर – ०६
एकूण ३०