राजकारण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अचानक मुंबई हायकोर्टात भेट
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक हायकोर्टात पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अचानक हायकोर्टात भेट दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल व महाधिवक्ते अभिषेक कुंभकोणी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांची ही सदिच्छा भेट होती, असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तर, हायकोर्टात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण सुरु असल्यामुळं मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे, असंही सांगण्यात येत आहे.