राजकारण

एनआयएकडून सचिन वाझेसह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केलं आहे. एनआयएने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. १० हजार पानांचं आरोपपत्र असून त्यात १० आरोपींविरुद्ध आरोपपत्र तयार करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात अनेक साक्षीदार, तांत्रिक पुरावे शिवाय अनेक पुरावे जोडण्यात आले आहेत.

एनआयएने ऑगस्ट महिन्यात न्यायालयाकडे आरोपपत्र दाखल करण्यासाठी अधिकचा अवधी मागितला होता. यानंतर न्यायालयाने एनआयएला ३० दिवसांचा अवधी दिला. दरम्यान, आज एनआयएने मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया घराच्याबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकं ठेवलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. दरम्यान, ज्या गाडीत स्फोटकं ठेवण्यात आली होती, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी ठाण्याच्या खाडीत सापडला होता. यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयकडे गेला. एनआयएने सचिन वाझे याला मनसुख हिरन हत्या प्रकरणात आरोपी केलं. याशिवाय, सचिन वाझे याच्या इतर साथिदारांना देखील एएनआयने ताब्यात घेतलं.

पुढील दहा जणांविरोधात आरोपपत्र : १) सचिन वाजे, २) रियाजुद्दीन काझी, ३) विनायक शिंदे, ४) प्रदीप शर्मा, ५) सतीश मोटकर, ६) मनीष सोनी, ७) संतोष शेलार, ८) नरेश गोर, ९) आनंद जाधव, १०) सुनील माने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button