Top Newsराजकारण

नद्यांमध्ये तरंगणारे मृतदेह दिसत नाहीत का? राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा

नवी दिल्ली : देशात कोरोनाने रौद्र रूप धारण केलं आहे. कोरोनामुळे रोज हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतोय. तरीही पंतप्रधानांना नव्या संसदेचं म्हणजे सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच सुचत नाही अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही असंही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.

उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नद्यांमध्ये कोरोना रुग्णांचे मृतदेह

कोरोना काळात उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणामधील नद्यांमध्ये रुग्णांचे मृतदेह तरंगताना दिसत आहेत. असं सांगण्यात येतंय की स्मशानात मृत्यू झालेल्या रुग्णांना दहन करण्यासाठी जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे हे मृतदेह नद्यांमध्ये सोडण्यात येत आहेत. या घटनेवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय.

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरणाच्या मोहिमेवरही टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाइन बुकिंगचीही सुविधा मिळावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button