राजकारण

घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही – सोमय्या; रुग्णालयातून डिस्चार्ज

पुणे : भाजपचे नेते किरीट सोमय्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी शिवसैनिकांनी राडा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेत जाण्यापासून रोखलं. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्कीही केली. या गदारोळात सोमय्या पायऱ्यांवर पडले. यात दुखापत झालेल्या सोमय्या यांना संचेती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

किरीट सोमय्या यांनी ट्विटरद्वारे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी म्हटलं की, पुण्यातील संचेती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पुणे महापालिकेत जाऊन संजय राऊत कौटुंबिक भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध कोविड सेंटर्स घोटाळ्यांबाबत तक्रार दाखल केली. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माफिया, मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाहीत.

किरीट सोमय्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की गुंडाराज, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. किरीट सोमय्या यांना मारण्याचा डाव होता. एकजण त्यांच्यामागे दगड घेऊन धावत होता. हा जीवघेणा हल्ला होता. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हल्ला करतायत. ही लोकशाही आहे की गुंडाराज आहे. पुणे महापालिकेची सुरक्षा यंत्रणा काय करत होती? पुणे पोलीस काय करत होते? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button