महिला

आगामी ५ वर्षांत महिला उद्योजक संचालित व्‍यवसायांमध्‍ये ९० टक्के वाढ अपेक्षित

एडेलगिव्‍ह फाऊंडेशनच्या अहवालातील निष्कर्ष

मुंबई : प्रतिष्ठित परोपकारी संस्‍था एडेलगिव्‍ह फाऊंडेशनने शुक्रवारी त्‍यांचा ‘लँडस्‍केप स्‍टडी ऑन वुमेन आंत्रेप्रीन्‍युअरशीप’ अहवाल सादर केला. हे व्‍यापक राष्‍ट्रीय संशोधन महिला उद्योजकांची आव्‍हाने, त्‍यांच्‍या आरोग्‍य, सामाजिक-आर्थिक सुरक्षितता व कौटुंबिक कल्‍याण निष्‍पत्तींवरील परिणामावर लक्ष केंद्रित करते आणि महिला उद्योजक व त्‍या कार्यरत असलेल्‍या इकोयंत्रणेचे परिपूर्ण अवलोकन देते. १३ राज्‍यांमध्‍ये करण्‍यात आलेल्‍या या संशोधनामधून निदर्शनास आले आहे की अर्ध-शहरी व ग्रामीण भारतातील जवळपास ८० टक्‍के महिलांनी उद्योजक म्‍हणून सुरूवात केल्‍यानंतर त्‍यांच्‍या सामाजिक-आर्थिक व सांस्‍कृतिक दर्जामध्‍ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या महिलांनी स्‍वावलंबीपणा व आत्‍मविश्‍वासाचा देखील उल्‍लेख केला. हे संशोधन फाऊंडेशनच्‍या उद्यमस्‍त्री कॅम्‍पेनचा भाग आहे. या कॅम्‍पेनचा महिलांमधील उद्योजकता उत्‍साहाला चालना देण्‍याचा आणि भारतातील महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्‍यासाठी प्रमुख मार्ग म्‍हणून महिला उद्योजकला प्राधान्‍य देण्‍याचा मनसुबा आहे. महिला व बाल विकास मंत्रालयाचे सचिव श्री. राम मोहन मिश्रा यांच्‍या हस्‍ते ऑनलाइन कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातून हा अहवाल सादर करण्‍यात आला. निती आयोगाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी या कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान भूषवले.

बहुआयामी संशोधनाने महिला उद्योजकांच्‍या प्रवासाबाबत जाणून घेण्‍यासाठी सामाजिक, आर्थिक, वैयक्तिक ते कौटुंबिक अशा विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले आहे आणि इकोयंत्रणेमधील सरकार, एनजीओ व कॉर्पोरेट्सच्‍या भूमिकांकडे देखील पाहिले आहे. संशोधनामधून असे निदर्शनास येते की उद्योजकतेमुळे महिलांसाठी सामाजिक-सांस्‍कृतिक पैलूंमध्‍ये सुधारणा झालेली दिसण्‍यात आली असली तरीही महिला उद्योजकांसाठी उपलब्‍ध आर्थिक माहिती व संसाधनांमध्‍ये लक्षणीय पोकळी आहे आणि त्‍यांना विपणन, उत्‍पादन, तंत्रज्ञान व सामाजिक-सांस्‍कृतिक आव्‍हानांचा सामना करावा लागत आहे. महिला उद्योजकतेला पाठिंबा देण्‍याचा अनेक सरकारी योजना व धोरणे असली तरी महिला उद्योजकांकडून अशा योजनांचा अवलंब होण्‍याचे प्रमाण खूपच कमी आहे. सर्वेक्षण करण्‍यात आलेल्‍या महिला उद्योजकांपैकी फक्‍त १ टक्‍के महिलांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला आहे आणि यामागील प्रमुख कारण म्‍हणजे फक्‍त जवळपास ११ टक्‍के महिलांना कोणत्‍याही योजनांबाबत माहिती आहे. आर्थिक सहाय्यबाबत जागरूकतेचा अभाव, आवश्‍यक कागदपत्रे उपलब्‍ध नसणे, या योजनांचा वापर करण्‍याची प्रक्रिया ‘जटिल’ असण्‍याचा समज आणि गहाण ठेवण्‍यासाठी कोणतीही मालमत्ता नसणे ही यामागील काही कारणे होती. संशोधनाचा अंदाज आहे की पुढील ५ वर्षांमध्‍ये भारतातील महिला उद्योजक संचालित व्‍यवसायांमध्‍ये जवळपास ९० टक्‍क्‍यांनी वाढ होण्‍याची अपेक्षा आहे, तुलनेत याच कालावधीमध्‍ये हेच विकासाचे प्रमाण युएस व युकेमध्‍ये अनुक्रमे ५० टक्‍के व २४ टक्‍के असण्‍याची अपेक्षा आहे.

पत्रकार श्रीमती. फये डिसूझा यांच्‍याद्वारे नेतृत्वित लॉंच कार्यक्रमाचा भाग असलेल्‍या पॅनेल चर्चेदरम्‍यान बोलताना एडेलगिव्‍ह फाऊंडेशनच्‍या कार्यकारी अध्‍यक्ष विद्या शाह म्‍हणाल्‍या, ”भारतातील महिला सांस्‍कृतिक क्रांतीमध्‍ये, त्‍यांच्‍या व्‍यवसाय निर्मितीमध्‍ये आणि भावी महत्त्वाकांक्षी महिला उद्योजकांसाठी मार्ग शोधून काढण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहेत. त्‍यांच्‍या भूमिका देशाचा आर्थिक विकास, रोजगार निर्मिती व औद्योगिकीकरण वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाच्‍या आहेत. योग्‍य प्रशिक्षण, इन्‍सेटिवायझेशन, आर्थिक व सांस्‍कृतिक मान्‍यता देणा-या धोरणांचा अवलंब व योजनांची अंमलबजावणी भारतातील महिला उद्योजकांच्‍या यशासाठी महत्त्वाचे आहे हे संशोधन आमच्‍या उद्यम स्‍त्री कॅम्‍पेनचा पाया आहे. या कॅम्‍पेनचा सहयोग व पोहोच माध्‍यमातून भारतातील महिला उद्योजकांसाठी समान व सक्षम वातावरण निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे.”

एडेलगिव्‍ह फाऊंडेशनच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी नग्‍मा मुल्‍ला पॅनेल चर्चेदरम्‍यान म्‍हणाल्‍या, ”महिलांना आर्थिकदृष्‍ट्या सक्षम करणे हे पूर्णत: विकासावर अवलंबून आहे. महिलांमध्‍ये स्‍वालंबीपणा व आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यापासून महिला जगत असलेल्‍या जीवनाचा दर्जा वाढवण्‍यापर्यंत उद्योजकता त्‍यांच्‍या सक्षमीकरणाला चालना देते. तसेच उद्योजकता त्‍यांना स्‍वत:साठी, तसेच त्‍यांच्‍या मुलांसाठी दर्जेदार शिक्षण व उत्तम आरोग्‍यासंदर्भात योग्‍य निर्णय घेण्‍यामध्‍ये स्‍वायत्तता व निर्णय घेण्‍याचा अधिकार देते. आमचा विश्‍वास आहे की उद्यम स्‍त्री उपक्रम सामाजिक प्रगती व कल्‍याणासाठी उत्‍प्रेरक ठरू शकतो.”

प्रमुख निष्‍पत्तींच्‍या आधारावर संशोधन शिफारस करते की राज्‍यांनी त्‍यांच्‍या विशिष्‍ट गरजा ओळखण्‍यासाठी मेटा-अॅनालिसिस करावे, संबंधित प्रोग्राम्‍स डिझाइन करून त्‍यांची अंमलबावणी करावी, टॅक्‍स इन्‍सेटिव्‍ह्जसह समान ब्रॅण्‍डअंतर्गत महिला उद्योजकांकडील उत्‍पादनांना चालना द्यावी, अकाऊंटिंग, एचआर मॅनेजमेण्‍ट व कम्‍युनिकेशन ही कौशल्‍ये आत्‍मसात करणारे सॉफ्ट-स्किल्‍स प्रशिक्षण राबवावे, नैतिक पाठिंब्‍यासाठी जागरूकता कार्यक्रम व समुदाय एकत्रीकरण उपक्रम राबवावे आणि उदयोन्‍मुख उद्योजकांना त्‍यांच्‍या उद्योगांना आकार देण्‍यासोबत विस्‍तारित करण्‍यामध्‍ये सक्षम करण्‍यासाठी स्‍थानिक पातळ्यांवर मेन्‍टोरशीप उपक्रम राबवावेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button