महिलासाहित्य-कला

महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

मुंबई : यंदाच्या महिलादिनी, ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने अथक परिश्रम घेणाऱ्या महिलांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक आव्हानांना यशोगाथेच्या रुपात बदलून या महिलांनी आम्हाला थक्क केले आहे. महिला या प्रथम क्रमांकाच्या मल्टी टास्कर्स, काम-कुटुंब, सामाजिक अपेक्षांच्या उत्तम व्यवस्थापक असून हे काम त्या उत्साहाने व सहजतेने करत असतात. ४ मार्च रोजी ट्रेलने “सुपरस्त्री” उपक्रम लाइव्ह घेत अशा विविध आघाड्यांवर दररोज काम करणाऱ्या महिलांना सलाम केला.

प्लॅटफॉर्मवर ५ दिवस चालणाऱ्या या कँपेनमध्ये गीतिका चक्रवर्ती, अनुस्वामी, प्रदिणीसुर्व, शिफा मर्चंट या ट्रेलवरील अग्रगण्य निर्मात्यांसह अनेकजण विविध विषयांचा उल्लेख करतील. प्रत्येक आई ही सुपरस्त्री कशी आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आदर्श स्त्री व्यक्तिरेखांचे पात्र साकारत त्यांचे कार्य दर्शवले जाईल. सुपरस्त्री सेलिब्रेशनमध्ये या महिला ट्रेलर्ससह काही पुरुष निर्मातेही सहभागी होतील. त्यात क्लिन्स वर्गीस आणि मेसडॉन यांचा समावेश आहे. भारतीय महिला सर्वोत्कृष्ट का आहेत यावर तसेच भारतातील आदर्श स्त्रियांवर ते नृत्याद्वारे आदरांजली वाहण्याचे व्हिडिओ तयार करतील.

ट्रेल प्लॅटफॉर्मवरील ‘डिस्कव्हरी सेक्शन’ मध्ये टॉप परफॉर्मिंग फिमेल क्रिएटर्स दिसतील. दररोज प्रत्येक श्रेणीत प्रेरणादायी ठरणाऱ्या या महिला असतील. कँपेनच्या अखेरीस ८ मार्च रोजी एक सर्वसमावेशक व्हिडिओ प्रदर्शित केला जाईल. त्यात ट्रेलवरील सर्वात लोकप्रिय महिला निर्मात्या “सुपरस्त्री”कशा आहेत हे सांगण्यात येईल.

हा महिला केंद्रित उपक्रम इंग्रजी, मराठी, हिंदी, बंगाली, कानडा, तेलगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील असंख्य आकर्षक उपक्रमांनी युक्त असेल. महिलांना त्यांच्या आयुष्यातील क्रिएटिव्हिटी साजरी करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा ट्रेलच्या सुपरस्त्री मोहिमेचा उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button