महिला

ग्रामीण महिलांच्या सबलीकरणाकरिता बायरची GIZ आणि माविमसोबत भागीदारी

मुंबई : कोविड-19 महासाथीच्या उद्रेकाने मुंबईसारख्या महानगरांतील स्थलांतरीत कामगारांवर विपरीत परिणाम केला. मोठ्या प्रमाणावर लोक गावांकडे परतले. स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या दैनंदिन उत्पन्नासाठी शेतीच्या एकमेव माध्यमावर अवलंबून राहावे लागले. त्यांच्याकरिता आवश्यक स्त्रोत, अर्थसाह्य आणि शाश्वत शेतीकरिता लागणाऱ्या कौशल्याचा अभाव होता. ज्यावेळी स्थलांतरीत कामगार (बहुतांशी पुरुष) नोकरी आणि उत्पन्नाच्या शोधात शहरांत परतून जातील, त्यावेळी गावात राहणाऱ्या ग्रामीण महिलांवर लहानशी कुटुंबाची शेती एकहाती सांभाळण्याची जबाबदारी पडेल. लहानशा शेतजमिनीची मालकी असणाऱ्या महिलांना गुणवत्तापूर्ण कृषी साधनांची उपलब्धतता नसते किंवा त्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळत नाही. त्याचप्रमाणे या महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरुकतेविषयी किंवा आरोग्य सुरक्षेबाबत माहितीची वानवा असते.

ग्रामीण भागात रोजगार संधी निर्माण करणे तसेच महाराष्ट्राच्या विकसनशील भागात महिलांच्या आरोग्याबाबत जागरुकता करण्याच्या उद्देशाने बायरने Deutsche Gesellschaft für Internationale Zusammenarbeit (GIZ) GmbH या शाश्वत विकासाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्य तसेच आंतरराष्ट्रीय शिक्षण कार्य उपलब्ध करून देणाऱ्या वैश्विक सेवा पुरवठादारासमवेत आणि महिला विकासात कार्यरत असणाऱ्या निम-शासकीय महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)सोबत भागीदारी केली.

वर्षभर EUR 1 दशलक्ष (रु. 8.7 कोटी) कोविड-रिस्पॉन्स प्रोग्रामच्या साह्याने बायर, GIZ आणि माविम महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, अकोला, परभणी, सांगली, पालघर आणि अमरावती जिल्ह्यातील अल्प भूधारक महिलांना मदत करणार आहे. बायर, GIZ आणि माविम विकास भागीदारीत develoPPP.de programme मध्ये कार्यरत आहेत. GIZची अमलबजावणी जर्मन फेडरल मिनिस्ट्री फॉर इकनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (BMZ) च्या वतीने आहे.

“बायरकरिता हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आम्ही आमच्या पीक विज्ञान तसेच औषधनिर्मिती व्यवसायाशिवाय ग्रामीण महिलांचे चांगले पोषण आणि आरोग्याच्या दृष्टीने योगदान देत आहोत. अल्प भूधारक महिलांना शेतीच्या आधारे रोजगारात सुधारणा करण्याची संधी बायर देईल. त्याचप्रमाणे महिलांत आरोग्यविषयक जागरुकता निर्माण करण्यास साह्य करेल,” असे दक्षिण आशियाचे वरिष्ठ बायर प्रतिनिधी डी. नारायण यांनी सांगितले. त्यापुढे बोलताना ते म्हणाले की, “बायरची GIZ सोबत जागतिक स्तरावर तसेच भारतात प्रदीर्घ भागीदारी राहिली आहे. माविमच्या वतीने महाराष्ट्रात काही राज्य शासनाचे रोजगार कार्यक्रम राबविण्यात येतात. शक्तिशाली सामाजिक परिणाम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. GIZ आणि माविम समवेत बळकट भागीदारीत ग्रामीण महिलांचे सबलीकरण करणे, त्याचप्रमाणे या महिलांना अधिक स्वावलंबी करण्याकडे बायरचे उद्दिष्ट आहे.”

आजवर महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांतील 30 ब्लॉक/ गटांत कार्यरत असलेल्या 30 स्थानिक पातळीवर नोंदणीकृत महिला शेतकरी महासंघांसमवेत बायर काम करते आहे. प्रत्येक महासंघात 2000 हून अधिक सदस्य असतात. तसेच 13 ब्लॉक/ गटांतील 2500 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना शेतकीविषयक माहिती आणि सल्ले उपलब्ध होतात. उन्हाळ्यातील भाज्यांसंबंधीची कृषी माहिती 500 ते 1000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची शेतकरी महासंघांची योजना आहे. 2021 च्या खरीप हंगामापर्यंत 6,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.

“GIZ च्या वतीने अगोदरपासून लहान शेतजमिनी असलेल्या 6,000 शेतकऱ्यांना भाज्या, डाळी तसेच मक्याची लागवड करण्यासाठी कृषी-साधने उपलब्ध करून दिली आहेत. यासोबतच बायरच्या वतीने मार्गदर्शनपर सल्ला आणि प्रशिक्षणाची जोड उपलब्ध होणार असल्याने 9 जिल्ह्यांतील 20,000 शेतकऱ्यांवर अप्रत्यक्ष परिणाम दिसून येईल. मॉडेल फार्म्स (नमुनाआधारीत शेतं)च्या आधारे हे आयोजन करण्यात येईल. 2021 पर्यंत अशास्वरुपाची 80 शेतं विकसीत करण्याची योजना आहे. त्याशिवाय GIZ च्या वतीने गट स्तरावर महिला शेतकरी महासंघाच्या मालकीच्या 30 शेती साधनविषयक दुकानांना साह्य उपलब्ध करून देण्यात येईल. जेणेकरून बाजारात सुविधेला दुप्पट वेगाने चालना मिळेल,” असे GIZ इंडियाचे संचालक एनआरएम आणि अॅग्रोइकोलॉजी राजीव अहाल म्हणाले.

“माविमचे आरोग्य कर्मचारी 1000 गावांतील महिलांना साह्य करणार आहेत. बायरच्या वतीने विकसीत केलेल्या आरोग्य अभ्यासावर आधारलेले प्रशिक्षण महिलांना देण्यात येईल. या एकत्रित प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दुर्लक्षित जिल्ह्यांत ग्रामीण समृद्धीला ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्हाला मदत मिळणार आहे. ज्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी समुदायाच्या विकासासाठी होईल,” असे माविमच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रद्धा जोशी यांनी सांगितले.

“या वर्षभर चालणाऱ्या कोविड-रिस्पॉन्स प्रोजेक्टच्या पलीकडे जाऊन अल्प भूधारक महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच त्यांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने माविम शाश्वत प्रयत्न करेल. ही मोहीम बायरच्या बेटर लाईफ फार्मिंग उपक्रमाद्वारे चालविण्यात येते आहे, जिथे अल्प भूधारक महिला आणि महिला शेतकरी महासंघांना व्यावसायिक शेतीचे धडे देण्यात येतील. जेणेकरून महिलांचे व्यावसायिक पद्धतीने शेती करण्याने सबलीकरण होईल, त्यांना शाश्वत उत्पनाची मदत मिळेल. जेणेकरून त्यांना उत्पन्नासाठी शेती व्यतिरिक्त साधनांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही,” असे उदगार माविमच्या चेअरमन ज्योती ठाकरे यांनी समारोप घेताना काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button