बसप सुप्रीमो मायावतींची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतून माघार
लखनऊ : बसपा सुप्रीमो मायावती निवडणूक लढणार नाहीत. मी देखील उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवणार नाही. तसेच, माझी पत्नी कल्पना मिश्रा आणि माझा मुलगा कपिल मिश्राही निवडणूक लढवणार नाहीत. मायावती यांचा भाचा आकाश आनंदही निवडणूक लढवणार नाही, असे बसपचे नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी सांगितले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पार्टीने (बसपा) ही घोषणा केली आहे.
सतीश चंद्र मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशात बसपचे सरकार स्थापन होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी भाजप आणि समाजवादी पक्षात लढत आहे. निवडणुकीपूर्वी किंवा नंतर बसपची कोणाशीही युती होणार नाही.
ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील ब्राह्मण आमच्यासोबत आहेत. ब्राह्मण भाजपसोबत जाऊ शकत नाही आणि ब्राह्मण समाजवादी पक्षात कधीच नव्हता. त्यांचे वास्तव त्यांना माहीत आहे. भाजप सरकारमध्ये ब्राह्मण समाजातील ५०० हून अधिक लोकांची हत्या झाली. १०० हून अधिक एन्काउंटर झाले. बसपने त्यांचा सन्मान कसा वाढवला हे ब्राह्मण समाजाने आधीच पाहिले आहे.
प्रत्येक ठिकाणी अधिकार देण्याचा विषय असो, विधान परिषदेवर १५ आमदार बनवण्याचा विषय असो, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन अध्यक्ष बनवण्याचा विषय असो आणि उत्तर प्रदेशात ४ हजारांहून अधिक सरकारी वकील बनवण्याचा विषय असो सर्वच ठिकाणा ब्राह्मणांना सन्मान देण्यात आला आहे, असे सतीश चंद्र मिश्रा म्हणाले.