नवीन ‘जग्वार एफ-पेस’साठी बुकिंगला सुरूवात
मुंबई : जग्वार लँड रोव्हर इंडियाने आज भारतामध्ये नवीन जग्वार एफ-पेससाठी बुकिंग्ज सुरू केल्याची घोषणा केली. आकर्षक नवीन एक्स्टीरिअर, सुरेखरित्या तयार केलेले नवीन इंटीरिअर, आधुनिक पिढीतील पीव्ही प्रो इन्फोटेन्मेंट आणि इन-लाइन फोर-सिलिंडर पेट्रोल व डिझेल इंजिन्समधून निवड करण्याची सुविधा असलेली नवीन जग्वार एफ-पेस अधिक लक्झरीअस, कनेक्टेड व कार्यक्षम आहे.
जग्वार लँड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, ”नवीन अवतारामधील नवीन जग्वार एफ-पेसचे आकर्षक डिझाइन कॉन्टर्स, रोमहर्षक कामगिरी आणि अधिक लक्झरीअस व कनेक्टेड अनुभव निश्चितच अनेक भारतीयांची मने जिंकतील.”
नवीन जग्वार एफ-पेस भारतात पेट्रोल व डिझेल पॉवरट्रेन्समधील आर-डायनॅमिक एस ट्रिममध्ये ऑफर करण्यात येईल आणि डिलिव्हरींना मे २०२१ पासून सुरूवात होईल. नवीन जग्वार एफ-पेसबाबत अधिक माहितीसाठी कृपया www.jaguar.in येथे भेट द्या.
भारतात जग्वार प्रोडक्ट पोर्टफोलिओ
जग्वारच्या भारतातील रेंजमध्ये एक्सई (XE) (किंमत ४६.६४ लाख रूपयांपासून), एक्सएफ (XF) (५५.६७ लाख रूपयांपासून), आय-पेस (I-PACE) (किंमत १०५.९ लाख रूपयांपासून) आणि एफ-टाइप (F-TYPE) (किंमत ९५.१२ लाख रूपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. उल्लेख करण्यात आलेल्या सर्व किंमती या भारतातील एक्स-शोरूम किंमती आहेत.
भारतातील जग्वार लँड रोव्हर रिटेलर नेटवर्क
जग्वार लँड रोव्हर वाहने भारतात अहमदाबाद, औरंगाबाद, बेंगळुरू (३), भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई (२), कोइम्बतूर, दिल्ली (२), गुरगाव, हैद्राबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, लुधियाना, मंगलोर, मुंबई (२), नोएडा, पुणे, रायपूर, सुरत आणि विजयवाडा या २४ शहरांमधील २८ अधिकृत आउटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.