रस्ता सुरक्षिततेचा प्रसार करण्यासाठी दृष्टिहीन सायकलस्वार अजय लालवानीचा ७,५०० किमी प्रवास
प्रवासाला प्रकाशयोजनेमधील जागतिक अग्रणी सिग्निफायचा पाठिंबा
मुंबई : अजय लालवानी या दृष्टिहीन सायकलस्वार रस्ता सुरक्षा आणि आपल्या देशाच्या रस्त्यांवर पुरेशी प्रकाशयोजना असण्याच्या गरजेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी भारतभरात ७,५०० किमीचा प्रवास सुरू करत आहे. तो मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून सायकलवरून या प्रवासाला सुरूवात करेल आणि श्रीनगर, कन्याकुमारी अशा देशाच्या कानाकोप-यापर्यंत प्रवास करत मुंबईमध्ये परत येईल. तो ४५ दिवसांमध्ये १२ राज्यांमधून प्रवास करणार आहे. त्याचे ध्येय प्रकाशयोजनेमधील जागतिक अग्रणी सिग्निफायला (पूर्वीची फिलिप्स लायटिंग) पाठिंबा देण्यासंदर्भात आहे.
अजय हा २५ वर्षीय दृष्टिहीन सायकलस्वार आहे. त्याने यापूर्वी मुंबई-गोवा-मुंबई आणि दादर-गोंदिया-दादर असे अंध सायकलिंगमध्ये दोन वर्ल्ड रेकॉर्डस् स्थापित केले आहेत. त्याने ज्यूडो व कबड्डीमधील राष्ट्रीय स्तरीय पॅरा-स्पोर्टस् स्पर्धांमध्ये अनेक पदके देखील जिंकली आहेत.
या प्रवासाबाबत अजय लालवानी म्हणाला, दरवर्षी आपल्या देशामध्ये रस्ते अपघातांमुळे अनेकांचा मृत्यू होतो. या उपक्रमासह मी रस्त्यांवरील योग्य प्रकाशयोजनेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याची आशा करतो. मला आनंद होत आहे की, सिग्निफाय मला या ध्येयामध्ये पाठिंबा देत आहे. मी या ४५ दिवसांच्या शेवटी माझे स्वप्न पूर्ण होण्याची आशा व्यक्त करतो.
याप्रसंगी सिग्निफाय इनोव्हेशन्स साऊथ एशियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित पद्माकर जोशी म्हणाले, सिग्निफायमध्ये आम्ही अजयच्या कटिबद्धतेला सलाम करतो. तो रस्ता सुरक्षिततेबाबत जागरूकतेचा प्रसार करण्यासाठी देशभरात या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात करत आहे. रस्त्यांवर पुरेशी प्रकाशयोजना रस्ता सुरक्षा वाढवत अपघातांचे प्रमाण कमी करण्यामध्ये मोठी भूमिका बजावू शकते. अजयसोबत सहयोगाने आम्ही देशाचे या कार्याप्रती लक्ष वेधून घेण्याची आणि भविष्यात आपल्या देशामध्ये सुरक्षित रस्ते असण्याची आशा करतो. तो आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. आमच्याकडून त्याला त्याच्या या प्रवासासाठी शुभेच्छा!