राजकारण

मंत्र्यांना बदनाम करण्याचे भाजपचे षडयंत्र : जितेंद्र आव्हाड

मुंबई : भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनसुख प्रकरणात केलेल्या आरोपांना सरकारच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड म्हणाले की, विरोधी पक्षातील अनुभवी नेत्यांनी मनसुख हिरेन प्रकरणात काही प्रश्न उपस्थित केले आहेत ते आश्चर्यकारक आहेत. यामध्ये असे म्हटले आहे की, मनसुख हिरेन यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रुमालाचा उल्लेख नाही. परंतु पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शवविच्छेदनाचा अहवाल असतो. रुमाल हा जी मृतदेहासोबत मालमत्ता जप्त केली जाते त्यामध्ये पोलीस स्टेशनला पाठवली जाते. यानंतर ती मालमत्ता केंद्रीय लेबॉरेटरीला पाठवण्यात येते. भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसुख हिरेन प्रकरणात पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे या संपूर्ण प्रकरणाची दिशा भरकटवत असल्याचा आरोप केला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेलार यांचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

समुद्रात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरा आणि फावना असतात (शेवाळ) झाड, पाने असे वेगवेगळे प्रकारचे घटक मानवी शरीरात जात असतात यामध्ये सगळ्या शेवटी जे शेवाळ शरीरात जातो तो बोन मॅरोमध्ये जातो. तो बोन मॅरो तपासल्यानंतर व्यक्ती बुडून मेला का याची माहिती मिळते. त्यामुळे याचा तपास केला जातो. एटीएसचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे हे दाखले आहे. तपासात उगच संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरु असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

सरकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवत त्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. कुंटेंनी रश्मी शुक्लांविरोधात अहवाल लिहिल्याने विरोधी पक्ष नाराज झाला आहे का? तुम्ही जे पहिले पान दाखवले त्यावर गोपनीय लिहिले आहे, मग हे कस काय फुटले असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना विचारला आहे. हे सर्व संभ्रम निर्माण करण्यासाठी केले जात आहे. एटीएसचा तपास योग्य रितीने सुरु होता. महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही मंत्र्याने कुठेही केला नाही. महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button