राजकारण

भाजप २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार : बावनकुळे

मुंबई : भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यात एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजप कामला लागली आहे. भाजपने मागील विधानसभा निवडणूकीत ‘वन बूथ, १० युथ’ अभियान राबवले होते यामध्ये भाजपला चांगले यशही मिळालं होतं. मात्र आता एकहाती सत्ता आणण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात युवांना भाजपमध्ये सामील करण्याची मोहीम आखली आहे. २५ लाख युवा तरुणांना यामध्ये सहभागी करण्याचे लक्ष असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.

भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका मुलाखतीमध्ये २५ लाख युवा वॉरियर्स नेमणार असल्याची माहिती दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहेकी, भाजपची तयारी नेहमीच सुरु असते परंतू १८ ते २५ वयोगटाचा युवा वॉरियर्स तयार करण्याचे अभियान आम्ही घेतलेलं आहे. हे अभियान यशस्वी होणार आहे. मी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर सात दिवस होतो. तसेच पुण्याचाही दौरा केला आहे. जनतेमध्ये राज्य सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही काम केलं आहे त्याबद्दल नागरिकांना आपुलकी आहे. असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

भाजपचा १ बूथ १० युथ हा युवा मोर्चा काम करतो आहे. पण आता युवा वॉरियर्स अभियान तयार केलं आहे. हा युवा मोर्चाचाच भाग असल्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला अधिक जनाधार मिळाला होता. यामुळे जर भाजप स्वबळावर निवडणूक लढली तर त्याहून अधिक जनाधार मिळण्याची शक्यता असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषदेत म्हटलं होते. भाजप राज्यात युवा तरुणांना सहभागी करण्यासाठी काम करणार असल्याची माहितीसुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

गुलाबराव पाटील यांची खोचक टीका

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपमध्ये तिकीट मिळत नाही आणि काय बढाई मारतो! एकनाथ खडसे यांना तिकिट मिळालं नाही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. भाजप ओबीसी नेत्यांना संपवण्याचे काम करत आहे. पहिलं आपली दुकानं पक्की करा अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button