Top Newsराजकारण

शिवरायांच्या पुतळा प्रकरणात भाजपने हात झटकले; रवी राणांच्या तिन्ही नगरसेवकांचे राजीनामे

अमरावती : अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा तिन्ही नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपने या प्रकरणात पाठिंबा न दिल्यामुळे नगरसेवकांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे. याआधी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अमरावती महानगरपालिकावर मोर्चा काढला होता.

अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी कोणतीही परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. कोणतीही परवानगी न घेतल्यामुळे महापालिका आणि पोलिसांनी हा पुतळा बाजूला हटवला होता. या मुद्यावरून रवी राणा आक्रमक झाले आहे.

आज अमरावती महापालिकेवर रवी राणा यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या तिन्ही नगरसेवकांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. सुमती ढोके, आशिष गावंडे व सपना ठाकूर यांनी नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहे. या तिन्ही नगरसेवकांचे अमरावती पालिकेमध्ये भाजपला युवा स्वाभिमान पक्षाच्या नगरसेवकाचे समर्थन होते. मात्र, याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी कुठलीही भूमिका न घेतल्याने आम्ही राजीनामे देत आहोत, असे युवा स्वाभिमानच्या नगरसेविका सुमती ढोके यांनी सांगितले आहे. महानगरपालिकेने शिवाजी महाराजांचा पुतळा उचलून तो अक्षरश: या महानगरपालिकेच्या भंगारामध्ये टाकल्याचा आरोप सुद्धा सुमती ढोके यांनी केला. आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा वाचू शकत नसेल तर आमची महानगरपालिकेत राहण्याचे लायकी नसलेले ते सांगत या तीनही नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे. महानगरपालिका आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी आमदार रवी राणा यांनी कोणतीही परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाण पुलावर शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता. पण प्रशासनाने कोणतीही परवानगी न घेता बसवलेला पुतळा प्रचंड पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आला होता. रात्री राजापेठ उड्डाण पुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते, नंतर हा पुतळा काढण्यात आला. हा पुतळा महानगर पालिका व पोलिस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आ रवी राणा व खा नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी रवी राणा यांनी ३ दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती, पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button