राजकारण

भाजप-मनसे युतीच्या चर्चेला वेग येणार; चंद्रकांतदादा उद्या राज ठाकरेंना भेटणार

मुंबई : राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप-मनसे युतीसाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. सदिच्छा भेट देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होते, असं म्हणत एकप्रकारे युतीच्या चर्चेचे सूतोवाच देखील केले. मात्र, मनसे परप्रातियांबद्दलची भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत आम्ही युतीची पुढील चर्चा करणार नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका स्पष्ट केली तर आम्ही युतीबाबत विचार करू, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्याबाबत पुणे दौऱ्यावर असताना राज यांना विचारण्यात आलं. त्यावर, भूमिका क्लिअर काय करायच्या. माझ्या भूमिका क्लिअर आहेत. माझ्या भूमिका आजपर्यंत मांडल्या त्या अत्यंत स्पष्ट आहेत. त्या देश हिताच्या आहेत आणि महाराष्ट्र हिताच्या आहेत. त्यात प्रत्येक राज्यांनी आपली भूमिका कशी निभावली पाहिजेत. काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही आमच्यावर आक्रमण करू नका. आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. आसाम आणि मिझोराममध्ये सध्या तेच होत आहे, असं ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button