Top Newsराजकारण

भाजप आ. मंदा म्हात्रे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?

मुंबई : भाजप आ. मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मंदा म्हात्रे यांनी भाजपचे आमदार असलेल्या गणेश नाईकांवर निशाणा साधला होता. रुग्णालय उभारणीच्या कामावरुन त्यांनी भाजपच्या आमदारावर निशाणा साधल्यामुळे नवी मुंबईत भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे दिसून आलं होतं. त्यामुळे मंदा म्हात्रे यांची पुढची राजकीय दिशा नेमकी काय ठरते, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागलंय.

भाजप आ. मंदा म्हात्रे या खरंतर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत्या. मधल्या काळात त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही जोरात रंगली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा मंदा म्हात्रे या बऱ्याच काळानंतर पुन्हा राष्ट्रवादी कार्यालयात गेल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा जोरात रंगली आहे. या भेटीदरम्यान, त्यांनी जयंत पाटील यांच्यासोबत बातचीत केली. या वेळी झालेल्या चर्चेत नेमकं काय झालं, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी विकासकामांसाठी भेट घेतली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

मंदा म्हात्रे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमुळे आता राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मंदा म्हात्रे या पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी इच्छुक आहेत की काय, अशी कुजबूज ऐकायला मिळतेय. मात्र याबाबत अजूनही कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र येत्या काळात नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं या भेटीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button