राजकारण

भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार धरमचंद चोरडिया यांचे निधन

पुणे : धुळे जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी आमदार व भाजपाचे पूर्व प्रदेश संघटनमंत्री धरमचंद चोरडिया (वय ७१ वर्ष) यांचे पुणे येथे आपल्या मुलाकडे आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथेच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी आमदार धरमचंद चोरडिया हे १९७७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता होते. १९७८-८१ या काळात ते भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस होती. १९८२ साली ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय चिटणीस झाले. त्याकाळात त्यांनी राष्ट्रीयस्तरावर केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भाजपात प्रदेश चिटणीसपद मिळाले. त्यानंतर ते प्रदेश संघटनमंत्री होते.

धरमचंद चोरडिया १९८४ ते ९० याकाळात धुळे पालिकेचे सदस्य होते. त्यानंतर ते १९९२ साली जूनमध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी १९ महिने कारावास भोगला होता. तसेच मराठवाडा नामांतर आंदोलनातही कारावास भोगला होता. ते जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपदावरही होते.

विधान परिषदेचे आमदार असतांना १९९२ मध्येच त्यांचा जोधपूर येथे कौटुंबिक कार्यक्रमास गेले असतांना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ते सक्रीय राजकारणापासून लांब गेले होते. धुळ्यात माजी प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह जे नेते आले त्यांनी धरमचंद चोरडिया यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button