Top Newsराजकारण

भाजप नेते प्रसाद लाड यांचा माफीनामा; माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न

मुंबई: भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना नेते सचिन आहिर यांनी शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. फुटपाथवर येऊन दाखवावं त्याना शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं. तर अनेक नेत्यांनाही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे वाभाढे काढले. आपली चूक लपविण्यासाठी लाड यांनी माध्यमांवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. ती बातमी विपर्यास करून दाखवली आहे, असे सांगत मला कुठल्याही प्रकारे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांनी बाधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात लाड यांनी माफीनामा दिला आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. आज प्रसारमाध्यमातून माझ्या एका भाषणाचा विपर्यास करुन मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या वृत्तपत्र आणि माध्यमांमधून दिसायला लागल्या. परंतु या गोष्टीचं फार स्पष्टपणे स्पष्टीकरण करु इच्छितो की भिण्याचं कुठलंही कारण नाही, असे सांगत लाड यांनी आपली प्रचंड दहशत आहे असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा जेव्हा आरे ला कारे होईल तेव्हा कारेला आरेचं उत्तर दिलं जाईल. परंतु ज्या शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो. कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांबद्दल आम्ही आदर ठेवतो. त्या शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनबद्दल असं माझ्याकडून तरी कुठलही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button